Join WhatsApp group

Ads

-

मिटर रिडींग व बिल वाटप कामगांराचे कामबंद आंदोलनाचा इशारा.

By Sarkarmzanews

January 23, 2025 9:07 am

Ads

शाश्वत व कायम स्वरूपी रोजगाराची मांगणी

दिनांक २३ : बार्शिटाकळी:- तालुक्यासह जिल्हायातील मिटर रिडींग व बिल वाटप करणाऱ्या कामगारांनी आपल्या विवीध मागण्या संदर्भात ता.१ फेब्रुवारी २०२५ पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा एम एस ई डी सी एल मिटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मंगेश कवळे व अकोला मिटर रिडिंग कामगार संघटनेचे उपाध्यक्ष सतीश कानडे यांच्या उपस्थितीत ता.२० जानेवारी२०२५ रोजी गौरक्षनाथ सपकाळे कार्यकारी अभियंता विजवितरण कंपनी अकोला यांना एका निवेदना व्दारे देण्यात आला.


संपूर्ण महाराष्ट्र भर नादुरुस्त मिटर च्या जागी स्मार्ट मिटर (प्रीपेड मिटर) बसवण्याचे काम सुरू आहे, या मुळे मिटर रीडिंग घेणारे व वीज बिल वाटप करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे हातचे काम जाणार असल्याची दाट शक्यता असल्याने या कामगारांन वर येणाऱ्या काळात बेरोजगारीची वेळ येऊ शकते,

या बाबत शासनाला व महावितरन कंपनीला वेळोवेळी उपोषण आणि निवेदनाच्या स्वरूपात मागणी केली आहे .स्मार्ट मिटर लागल्या वर ही शासनाने मिटर रिडींग घेणारे व बिल वाटप करणाऱ्या कंत्राटी कामगारांना वयाच्या ६० वर्षा पर्यंत रोजगाराची शास्वती द्यावी.
या करीता नागपूर येथे ऊर्जा सचिवांना हिवाळी अधिवेशनात उपोषणाच्या माध्यमातून निवेदन दीले यावर ऊर्जा सचिव यांनी संघटनेशी चर्चा करण्याकरीता बैठक चे आश्वासन दीले ? मात्र महिना होऊन ही या वर संघटनेला कुठल्या प्रकारच्या चर्चेला बोलावले गेले नाही,म्हणून आमच्या कडे काम बंद आंदोलन शिवाय आता कुठलाहि पर्याय राहला नाही.


महावितरण कंपनी व शासना सोबत चर्चा करून मिटर रीडर व बिल वाटप कामगार यांचे शाश्वत रोजगार ची निश्चिती करत नाही तो पर्यंत नाईलाजाने काम बंद आंदोलनाला सामोरे जावे लागत आहे,या उलट फॉल्टी तसेच नादुरुस्त मीटरच्या
जागी राज्यभरात स्मार्ट प्री-पेड मीटर लावण्याचा सपाटा सुरु झाला आहे.

या मुळे मिटर रिडर व वीजबिल वाटप करणा-या कर्मचा-यांच्या मनात बेरोजगार होण्याची भीती निर्माण झाली आहे.या सर्व कर्मचा-यांचे समायोजन राज्य शासन कसे करणार आहे? या विषयी ३० जानेवरी पूर्वी संबंधित विभागाशी चर्चा करुन संघटनेच्या पदाधिका-यांना कळवण्यात यावे अन्यथा, १ फेब्रुवरी पासून कर्मचारी बेमुद्दत काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला.

या मुळे शासनाचे व महावितरण यांचे कुठल्या प्रकारचे आर्थिक नुकसान झाल्यास एम.एस.ई.डी.मी. एल मिटर रीडर कामगार संघटनेला वेठीस धरू नये. यावेळी विनोद ईचे,मनोज खांबलकर, आत्माराम बेलोकार,विवेक शिरसागर,संजय भाकरे, कुलदीप डोंगरे,,विजय भटकर, प्रदिप घुमसे, तसेच सर्व मिटर रिडर व बिलवाटप कामगार संघटनेचे पदधिकारी, उपस्थित होते.


No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!