Join WhatsApp group

Ads

---

‘मुद्रांक शुल्कात सवलतीचा सौदा महागला’; अकोल्यात जिल्हा निबंधक एसीबीच्या जाळ्यात

By Sarkar Maza

June 26, 2026 10:42 am

Ads

अकोला : अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात २५जून रोजी भ्रष्टाचाराला मोठा धक्का देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुद्रांक जिल्हा निबंधक किरण चौधरी यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह संपूर्ण शासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, एसीबीच्या धडक कारवाईची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.


माहितीनुसार, तक्रारदाराच्या अकोला एमआयडीसी परिसरातील एका भूखंडासंदर्भात थकीत मुद्रांक शुल्क निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू होती. संबंधित शुल्क भरण्यासाठी तक्रारदाराने अनेकदा कार्यालयाच्या फेऱ्या मारल्या. यावेळी त्यांना थकीत मुद्रांक शुल्काची रक्कम सांगण्यात आली. मात्र, ही रक्कम कमी करून देण्याच्या मोबदल्यात मुद्रांक जिल्हा निबंधक किरण चौधरी यांनी १० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.


लाचेची मागणी होताच तक्रारदाराने अकोला एसीबीकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने नियोजनबद्ध सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष किरण चौधरी यांना रंगेहात पकडले.


विशेष म्हणजे, अकोला जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या लाचखोरीच्या प्रकरणांवर एसीबीने सातत्याने कारवाईचा बडगा उगारला आहे. या महिन्यातील ही दुसरी मोठी कारवाई मानली जात असून, भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधातील एसीबीची मोहीम आणखी आक्रमक झाल्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहेत.

Related Article

माणुसकीचे दर्शन! विजेचा शॉक लागलेल्या युवकाचे प्राण वाचविण्यासाठी संजय नाईक यांची धाव

‘मुद्रांक शुल्कात सवलतीचा सौदा महागला’; अकोल्यात जिल्हा निबंधक एसीबीच्या जाळ्यात

अकोला जिल्ह्यात मान्सूनचा दमदार धडाका; शेतकऱ्यांना दिलासा, काही भागात पिकांचे मोठे नुकसान

राज्य सरकारचे आश्वासन; शेतकऱ्यांना आता हक्काची मदत हवी! तर आमदार हरिष पिंपळे यांची अग्नी परीक्षा

नाशिकमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त ‘ऑलिम्पिक सप्ताह’चे आयोजन, 23 ते 30 जूनदरम्यान विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन

अकोला जिल्हा प्रशासनाचा राष्ट्रीय सन्मान; ‘ई-भूमिती’ला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार – जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना नवी दिल्लीत राष्ट्रीय सन्मान

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!