Join WhatsApp group

मूर्तिजापूरचे श्रीधर अनिल पाटील कांबे यांना “आदर्श उपसरपंच व समाजसेवक” म्हणून समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर: २६ जुलै २५ रोजी ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, पिंपरी-चिंचवड येथे ए. डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित “भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जीवन गौरव व समाज रत्न पुरस्कार वितरण सोहळा 2025” उत्साहात आणि दिमाखात पार पडला.

या कार्यक्रमात मा. श्रीधर अनिलपाटील कांबे यांना “आदर्श उपसरपंच व समाजसेवक” म्हणून समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक योगदानाची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तुकाराम बाबा महाराज (मठाधिपती – संत बागडे बाबा आश्रम, जत)मा. वैशाली मार्तंड चव्हाण (सहाय्यक आयुक्त, पुणे महानगरपालिका)मा. श्री. अनिल जाहीर (तनिष्का फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य)

श्री. श्रीराम मांडुरके (अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे)श्रीमती प्राजक्ता मालुंजकर (रिल स्टार)कु. श्वेता परदेशी (इंटरनॅशनल मॉडेल)मा. ममता भोई (अभिनेत्री व मिस इंडिया – खानदेश)यांची विशेष उपस्थिती लाभली.कार्यक्रमात ए. डी. फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. अशोक गोरड यांनी महाराष्ट्रातील

विविध क्षेत्रांतील – शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कृषी आणि वैद्यकीय – अशा मान्यवरांचा गौरव करून त्यांना पुरस्कार प्रदान केले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!