Join WhatsApp group

Ads

कुरणखेडजवळ मध्यरात्री अपघाताची धडकी भरवणारी घटना; दोघांचा जागीच मृत्यू

By Sarkarmzanews

January 24, 2026 3:09 pm

Ads

कुरणखेड (ता. 24, शनिवार मध्यरात्री):राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुरणखेडजवळ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरातील पैलपाडा पेट्रोल पंपासमोर दोन ट्रकची समोरासमोर जबरदस्त धडक होऊन भीषण अपघात झाला.

या अपघातात दोन्ही ट्रकचे चालक जागीच ठार झाले. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.मूर्तीजापूरहून अकोल्याकडे जाणारा ट्रक क्रमांक NL-01-AK-1105 आणि समोरून येणारा ट्रक क्रमांक MH-28-BB-3667 यांच्यात ही धडक झाली.

अपघात इतका गंभीर होता की दोन्ही वाहनांतील चालकांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले होते. मृतांची ओळख पटवणे कठीण झाले होते.

मात्र तपासाअंती NL-01-AK-1105 या ट्रकच्या चालकाचे नाव जगजीत सिंग (रा. यवतमाळ), तर दुसऱ्या ट्रकच्या चालकाचे नाव देविदास नारायणन (रा. जळका भडंग, खामगाव) असल्याचे निष्पन्न झाले.घटनेची माहिती मिळताच वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

अपघातग्रस्त ट्रकांमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पथकाने मोठी कसरत करत अथक परिश्रम घेतले. त्यानंतर १०३३ रुग्णवाहिकेच्या साहाय्याने दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाने काही तासांतच परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झाले होते. पुढील तपास सुरू आहे.

मदत कार्यात सहभागी:वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक प्रमुख विजय माल्टे, शाहबाज शहा, उमेश माल्टे, अक्षय मोरे; पैलपाडा येथील आपत्कालीन पथकाचे रंजीत घोघरे, विरू देशमुख, योगेश विजयकर,राम उमाळे यांनी मृतदेह बाहेर काढणे व महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोलाची मदत केली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!