Join WhatsApp group

Ads

धक्कादायक, अमरावतीच्या परवाड्यामध्येच 65 वर्षीय वृद्ध महिलेवर 22 वर्षीय तरुणाचा बलात्कार

By Sarkar Maza

April 20, 2026 12:15 pm

Ads

सध्या सगळ्या राज्यात अमरावती जिल्ह्यातील परतवाडा प्रकरण गाजत आहे. आरोपी अयान अहमदने कशा प्रकारे तरुणींचं लैंगिक शोषण केलं. त्यांचे व्हिडिओ बनवले. आता याच परतवाड्यात एका 65 वर्षीय वृद्ध महिलेवर 22 वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणाने राज्याला हादरवून सोडलं आहे. सगळीकडे या गुन्ह्याची चर्चा असतानाच अमरावतीमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.

त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका 65 वर्षीय वृद्ध महिलेवर 22 वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका वृद्ध महिलेवर अत्याचार करून पैसे लुटणाऱ्या आरोपीला अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसबा पोलिसांनी अटक केली आहे.

आवेज युसुफ खान असं आरोपीचं नाव असून तो 22 वर्षांचा आहे. मिल्लतनगर परतवाडा येथे तो रहायला आहे.18 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. उपचारासाठी जात असलेल्या 65 वर्षीय वृद्ध महिलेला आरोपीने दुचाकीवर बसवून निर्जन ठिकाणी नेले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती अत्याचार करून 600 रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली.

घटनेनंतर पीडित महिलेला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.पीडितेच्या जबाबावरून शिरजगाव कसबा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. परतवाडा येथून आरोपीला पोलिसांनी 11 तासात अटक केली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!