Join WhatsApp group

Ads

-

शेतकऱ्यांच्या हितासाठी कुरणखेड येथे शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन

By Sarkar Maza

February 27, 2026 7:09 am

Ads

कुरणखेड- दिनांक 27 : अकोला जिल्ह्यात शिवसेना वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपर्क नेते अरविंद सावंत उपनेते आमदार नितीन देशमुख नेतृत्वाखाली गुरुवार दिनांक 26/2 /2026 रोजी सकाळी 11 वाजता कुरणखेड येथील हायवे क्रमांक 53 वर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकारने अमेरिकेसोबत व्यापार करार केला असून त्यामुळे शेतमालाच्या भावांमध्ये घट झाली आहे आणि शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे रास्ता रोको आंदोलनाद्वारे अमेरिकेसोबत चा व्यापार करार रद्द करावा अशी प्रमुख मागणी आंदोलक करत होते.

शिवसेना व शेतकरी संघटनांनी असा दावा केला आहे की अमेरिकेसोबत करारामुळे भारतातील कृषी बाजारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे आणि स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा अनुदान हेक्टरी 17000 जाहीर केले होते परंतु ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप जमा झालेली नाही अशी तक्रारी आंदोलक यांनी केली यावेळी या रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना मुर्तीजापुर विधानसभा संघटक माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल भटकर यांच्या नेतृत्वात कुरणखेड येथे सकाळी राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला.

यावेळी त्यांच्यासोबत उपतालुकाप्रमुख रंजित घोगरे, तालुका सचिव योगेश बोधळे, कुरणखेड सर्कल प्रमुख शुभम गावंडे, उपतालुकाप्रमुख युवा सेना गौरव महल्ले,कानशिवनी सर्कल प्रमुख दिनेश ढोरे, तथा असंख्य शेतकरी उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!