Join WhatsApp group

Ads

-

अकोल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर चाकू हल्ला; प्रकृती गंभीर

By Sarkarmzanews

January 6, 2026 3:15 pm

Ads

अकोला : दिनांक ०६ : अकोल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अकोट तालुक्यातील त्यांचे मूळ गाव मोहाळ येथे हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्ल्यात त्यांच्या पोटावर व मानेवर गंभीर घाव बसल्याचे समजते.

प्राथमिक माहितीनुसार, हिदायत पटेल यांचा पटेल कुटुंबाशी सुरू असलेला राजकीय वाद या हल्ल्यामागील कारण असू शकतो. मतीन उर्फ कालू पटेल यानेच हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या हिदायत पटेल यांना तातडीने उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले आहे.

त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांचे पथक उपचार करत असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.दरम्यान, या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत असून, हल्ल्यामागील नेमकी कारणे आणि आरोपीबाबत अधिकृत माहिती लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!