Join WhatsApp group

Ads

“ज्येष्ठ नागरिक रिकामे असतात, त्यांना प्रचारासाठी वापरा”माजी आमदार श्रीकांत देशपांडे

By Sarkarmzanews

January 3, 2026 7:50 pm

Ads

अकोला : दिनांक ०३ : “ज्येष्ठ नागरिक रिकामेच असतात, त्यांना प्रचारासाठी घेऊन या,” असे वादग्रस्त व अवमानकारक विधान शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी केल्याने अकोल्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

कार्यकर्त्यांच्या बैठकीत केलेल्या या वक्तव्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा अपमान झाल्याचा आरोप होत असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

निवृत्तीनंतरही समाजासाठी झटणाऱ्या, कुटुंबाचा आधार असलेल्या आणि राजकीय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना “रिकामे” ठरवणारे हे वक्तव्य अहंकारी व असंवेदनशील असल्याची टीका होत आहे.

मतं हवीत, पण सन्मान नको? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

देशपांडे यांनी स्वयंसेवकांची कमतरता असल्याचे कारण देत हे विधान केल्याचे सांगितले जात असले तरी प्रचारासाठी माणसं कमी पडू लागली आहेत का, असा सवालही उपस्थित होत आहे.

ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव, सल्ला आणि मार्गदर्शन न घेता त्यांना केवळ “वेळ आहे म्हणून” वापरण्याची मानसिकता असल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे.

या वक्तव्यावर विरोधी पक्षांकडूनही जोरदार टीका होण्याची शक्यता असून, ज्येष्ठ नागरिक संघटनांनी निषेध नोंदवण्याचे संकेत दिले आहेत.

सार्वजनिक जीवनात असलेल्या नेत्यांकडून जबाबदार भाषेची अपेक्षा असताना, असे वक्तव्य समाजात फूट पाडणारे ठरत असल्याचे मत व्यक्त होत आहे.दरम्यान, या प्रकरणावर माजी आमदार श्रीकांत देशपांडे किंवा त्यांच्या पक्षाकडून अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.

मात्र सोशल मीडियावर हा व्हिडिओ व वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, “ज्येष्ठ नागरिक अपमान सहन करणार नाहीत” अशी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!