Join WhatsApp group

Ads

-

मूर्तिजापूरात ‘सर्वाइकल कॅन्सर मुक्त भविष्य’ मोहिमेंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोफत लसीकरणामुळे शेकडो तरुणींना दिलासा; महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकतेला चालना

By Sarkar Maza

February 21, 2026 1:00 pm

Ads

मूर्तिजापूर, दि. २१ फेब्रुवारी : महिलांमध्ये आढळणाऱ्या सर्वाइकल कॅन्सरच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम हॉस्पिटल, अकोला, विप्र नारी शक्ती सेवा संस्था, मूर्तिजापूर व लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने “सर्वाइकल कॅन्सर मुक्त भविष्य” या उपक्रमांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या मोहिमेत शहरातील शेकडो तरुणींनी सहभागी होत दुसरे लसीकरण करून घेतले.

संत तुकाराम हॉस्पिटलतर्फे सुमारे २५०० रुपये किमतीच्या शेकडो लस मोफत उपलब्ध करून देण्यात आल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींनाही मोठा लाभ झाला. कार्यक्रमाला भाजप नगरसेवक मंडळींसह संत तुकाराम हॉस्पिटलचे डॉ. कमलजी शर्मा व श्री. के. ओ. शर्मा उपस्थित होते.

उपक्रम राजेंद्र नेमाडे (वैद्यकीय अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. रुग्णालय प्रशासनातर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विप्र नारी शक्ती सेवा संस्था, मूर्तिजापूर महिला मंडळ व डॉ. विक्रम शर्मा व डॉ. रश्मी शर्मा यांनी पुढाकार घेत महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच आमदार हरीश पिंपळे व भाजप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे आणि उपजिल्हा रुग्णालय कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.

महीलांन मध्ये सर्वाइकल कॅन्सर हा एचपीव्ही (HPV) विषाणूमुळे होणारा गंभीर आजार असून सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे दिसून न आल्याने उशिरा निदान होण्याची शक्यता असते. अनियमित रक्तस्राव, पोटदुखी, अशक्तपणा ही त्याची प्रमुख लक्षणे मानली जातात. योग्य वयात लसीकरण केल्यास या आजारापासून ९० टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळू शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

ग्रामीण व निमशहरी भागात महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकतेचा अभाव असल्याने अशा प्रकारच्या मोहिमा राबविणे काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. मोफत लसीकरणामुळे सर्वसामान्य कुटुंबांतील मुलींना संरक्षण मिळाल्याने या उपक्रमाला सामाजिक उपक्रमाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

महिलांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी शासन, आरोग्य यंत्रणा व सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे राबविलेला हा उपक्रम मूर्तिजापूरसाठी आदर्श ठरत असून भविष्यातही अशा मोहिमा सातत्याने राबविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Article

सोनम वांगचुकांच्या आंदोलनावर अकोला जिल्ह्यातील कोचिंग क्लासेस गप्प का?

अकोल्यात ‘नकली नोटांचा’ मोठा खेळ उघड! LCB च्या धाडीत ९७ हजारांच्या बनावट नोटा जप्त; मूर्तिजापूर कनेक्शन समोर

गुटखाबंदीचा फज्जा? बोरगाव मंजूत आजही सर्रास गुटखा विक्री; बनावट गुटखा रॅकेटचा संशय, प्रशासन झोपेत?

मूर्तिजापूर–बोरगाव–अकोला असा बनावट गुटखा रॅकेटचा प्रवास? कारवाईनंतर अनेक प्रश्न अनुत्तरित

कारंज्यात पेट्रोल-डिझेल चोरीचा गोरखधंदा? नॅशनल ढाब्यावर टँकरमधून इंधन उतरविण्याची चर्चा; स्फोटाच्या धोक्याने नागरिकांमध्ये चिंता

बेटा नंबरी… बाप दस नंबरी? अकोल्यातील बनावट गुटखा रॅकेटवर सलग दुसरी धडक कारवाई! अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे ऑपरेशन प्रहार

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!