Join WhatsApp group

Ads

-

मूर्तिजापूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त साडी वॉकथॉन 2.0 चे आयोजन

By Sarkarmzanews

March 8, 2025 2:12 pm

Ads

दिनांक ०८ : मुर्तीजापुर-येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सामाजिक कार्यात अग्रेसर अटल फाउंडेशन अकोला ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्था हॅपी वुमन्स क्लब ओम योग प्रतिष्ठान मूर्तिजापूर यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून साडी वॉकथॉन 2.0 या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी 9 मार्च सकाळी 6-30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून राजमाता मासाहेब जिजाऊ यांना अभिवादन करून पुढे अकोला नाका येथून डीपी रोड मार्गे आशीर्वाद लॉन येथे महिलांचे मनोरंजक खेळ घेण्यात येईल.

तसेच चालण्याचे फायदे व महिलांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करण्यात येईल तरी शेकडो महिलांनी या अविस्मरणीय कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन अटल फाउंडेशन चे विदर्भ विस्तारक विष्णू लोडम अकोला महिला जिल्हाध्यक्ष सौ रुपाली तिडके व अटल फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी केले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!