Join WhatsApp group

Ads

-

महसूल पथकाच्या वाहनाला धडक देऊन वाळूचा ट्रक पसार; ‘त्या’ वाळूचे गूढ काय?

By Sarkarmzanews

September 2, 2026 1:41 pm

Ads

कलम 303(2) 281324(4) आरोपी नयन महले रा. कोळसरा याचा विरुद्ध गुन्हा दाखल

मुर्तीजापूर : अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात गस्त घालणाऱ्या महसूल पथकाच्या शासकीय वाहनाला वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक देऊन पसार झाल्याची घटना १ सप्टेंबर रोजी मध्यरात्री लोणसना गावाजवळ घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

मात्र, विना क्रमांकाचा ट्रक मध्यरात्री वाळू घेऊन नेमका कोणत्या मार्गाने जात होता? त्याला वाळू कुठून मिळाली? तसेच महसूल पथकाला पाहताच वाहन न थांबविता चालकाने पसार होण्याचा प्रयत्न का केला? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.विशेष म्हणजे, महसूल पथकाच्या शासकीय वाहनाला धडक देऊनही ट्रक घटनास्थळावरून निघून गेल्याने वाळू वाहतुकीमागे एखादे मोठे जाळे कार्यरत आहे का?, अशी चर्चा स्थानिक पातळीवर सुरू झाली आहे.

विना क्रमांकाचे वाहन वापरण्यामागे नेमका उद्देश काय होता, याचाही तपास होणे गरजेचे आहे.ट्रकमध्ये अंदाजे एक ब्रास वाळू असल्याचे तक्रारीत नमूद असले, तरी ही वाळू नेमकी कुठून उत्खनन करण्यात आली आणि तिच्या वाहतुकीसाठी कोणतीही वैध परवानगी होती का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

या घटनेमुळे केवळ एका ट्रकचालकाचा विषय न राहता, मुर्तीजापूर परिसरातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस व महसूल विभागाच्या तपासातून या सर्व प्रश्नांची उत्तरे समोर येतात का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासात घटनेमागील संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

News Photo – Ai Genrated

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!