Join WhatsApp group

Ads

छत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडूने पुकारले आंदोलणास्त्र आमरण उपोषणाच पहिला दिवस

By Sarkarmzanews

September 30, 2024 6:17 pm

Ads

न्यूज डेस्क – छत्रपती संभाजीनगर तलवारबाजी खेळात आंतर विद्यापीठ, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये चमकदार कामगिरी करून राज्यासह देशाचे नाव उंचविणारे शिव छत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू सागर मगरे यांनी खेळाडूंच्या आरक्षणासह न्याय हक्कासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका घेत त्यांनी छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे आंदोलणास्त्र पुकारले आहे.

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार खेळाडूंना सांगली महानगरपालिके प्रमाणे शासकीय, निम शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यात यावी.

२४ मे २०२४ रोजी जाहीर केलेल्या ५ टक्के क्रीडा आरक्षणाचे प्रारूप मध्ये ३ राज्यस्तरीय स्पर्धा व त्यात १ अथवा २ पदक असावे या प्रमाणे क्रीडा आरक्षण असावे.

कनिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धेत विजेत्या खेळाडूंचा समावेश करून क्रीडा आरक्षण लागू करावे.

हे आरक्षण लागू होईपर्यंत कुठली भरती घेऊ नये.

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, रेशन दुकान, तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जामध्ये सवलत मिळावी.

शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना क्रीडा शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात यावी.

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना शासनाच्या वतीने मानधनावर प्रशिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात यावी.

११ सप्टेंबर २०२४ रोजी जाहिर झालेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडू नियुक्ती अ, ब व क गटातील करण्यात आलेली थेट नियुक्तीची चौकशी करण्यात यावी.

७ तालुका क्रीडा अधिकारी पदासाठी झालेल्या भरतीतील गैरव्यवहाराची चौकशी करून ज्या परीक्षार्थीचे नाव वगळण्यात आले, त्यांना मुलाखतीसाठी संधी देण्यात यावी.

खेळाडूंना म्हाडा, सिडकोचे घर देण्यात यावे.

क्रीडा शिक्षक भरती सुरु करावी.

१७ वर्षाखालील राष्ट्रीय खेळाडूंना छत्रपती संभाजी महाराज पुरस्काराने प्रोत्साहन म्हणून सन्मानित करण्यात यावे.

आदी मागण्यांसाठी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सागर मगरे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

क्रीडा संघटना, खेळाडूंनी दिला पाठिंबा

खेळाडूंच्या आरक्षणासह न्याय हक्कासाठी आमरण उपोषणास बसलेल्या सागर मगरे यांना विविध क्रीडा संघटना, राजकीय पक्ष तसेच खेळाडूंनी पाठिंबा दिला आहे.

संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू स्वतःहून या उपोषणात सहभागी होत आहे.

शिक्षक भारतीचे बिजू मारग, राजेंद्र रोडे, संजय बाजी पाटील, दीपक सपकाळ, सायकलिंग असोसिएशनचे भिकन आंबे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे गणेश पवार, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे प्रदीप विखे, विलास उमाप, ड्रॉप रोबॉल असोसिएशनचे डॉ. मुरलीधर राठोड, गणपत पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे डॉ. मयूर सोनवणे, क्रीडा संघटक सतीश पाठक, गोकुळ तांदळे, अमृत बिऱ्हाडे, सागर तांबे, सूरज आहेर, प्रशांत जमधडे यांनी पाठिंबा दिला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!