Join WhatsApp group

Ads

सागर मगरे यांना मंत्री अतुल सावे यांनी दिले आश्वासन

By Sarkarmzanews

October 5, 2024 4:29 pm

Ads

छत्रपती संभाजी नगर – महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट पुरस्कार शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त सागर मगरे यांचा खेळाडूंचे आरक्षण,शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या व क्रीडा शिक्षकांच्या न्यायाहक्कासाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी महाराष्ट्र राज्य चे गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, मा.ना.अतुलजी सावे साहेब यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषणकर्ते सागर मगरे यांनी उपोषण सोडले.

या वेळी उपस्थित शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त शिरीषजी बोराळकर, एस पी जवळकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे डॉ.मयूर सोनवणे,शिवाजी दांडगे विजय सोनवणे, अमोल चटप,खेळाडू प्रशिक्षण आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्या राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली आहे व त्या ठिकाणी पुढील दिशा ठरणार तसेच त्यात ही पुन्हा काही निर्णय घेण्यात आला नाही तर पुढील दिशा ठरवणार असे सागर मगरे यांनी सांगितले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!