Join WhatsApp group

Ads

वीरवाडा घाटावर महसूलचा ‘स्कॅम’ मोठ्या प्रमाणात, पण कारवाई मात्र थातूरमातूर!

By Sarkar Maza

March 26, 2026 9:36 am

Ads

मुर्तिजापूर | प्रतिनिधी :

वाळू माफियांच्या विरोधात महसूल विभागाने कारवाई करत दोन टिप्पर जप्त केले असले, तरी या प्रकरणाने अनेक गंभीर प्रश्न पुन्हा समोर आणले आहेत. करण्यात आलेल्या कारवाईत विना रॉयल्टी वाहन आढळून आले असून ते मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. पण सध्या अधिकारी वर्गा कडून या बद्दल कोणत्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया आली नाही संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास प्रसार माध्यमांना प्रतिसाद मिळाला नाही.

सूत्रांच अनुसार तहसीलदार शिल्पा बोबळे यांच्या आदेशानुसार पुढील प्रक्रिया सुरू आहे.प्राथमिक माहितीनुसार, पकडलेले वाहन विरवाडा घाटावरून वाळू घेऊन येत होते, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे या घाटावर सुरू असलेल्या अवैध उपशा बाबत संशय अधिक गडद झाला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हा केवळ एक नमुना असून दररोज अनेक ट्रक विनापरवानगी, विना रॉयल्टी वाळू वाहतूक करत असल्याचा आरोप होत आहे. महसूल विभागाने आता पर्यंत एक-दोन कारवाया करून दंड आकारला आणि वाहन सोडले जाते; मात्र त्यामुळे अवैध उपशावर कोणताही ठोस परिणाम होत नसल्याची टीका होत आहे.

या प्रकरणात काही मोठे प्रश्न ऐरणीवर आले आहेत—महसूल विभागाला किती फटका बसतोय? विना रॉयल्टी वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलाला मोठा आर्थिक तोटा होत आहे.पर्यावरणाचे किती नुकसान होतेय?

नियमबाह्य व यंत्रांच्या सहाय्याने होणाऱ्या वाळू उपशामुळे नदीपात्राची झीज, भूजल पातळी घट आणि परिसंस्थेचा समतोल बिघडत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, थातूरमातूर कारवाई महसूल विभाग करत असून ठळक कारवाई महसूल विभाग कधी करणार?

या सर्व प्रकाराकडे महसूल यंत्रणेची जाणून डोळेझाक होत असल्याची चर्चा असून, काही गावकऱ्यान कडून अप्रत्यक्ष पाठिंब्याचेही आरोप केले जात आहेत.

त्यामुळेच प्रश्न उपस्थित होतो—महसूल कर्मचाऱ्यांचे हात या घाटांमध्ये ओले आहेत का?

नागरिकांची ठाम मागणी आहे की, केवळ प्रतीकात्मक कारवाई न करता घाटावरच ऑन-द-स्पॉट यंत्रसामग्री जप्त करून संपूर्ण साखळीवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा वाळू माफियांचा हा धंदा थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!