Join WhatsApp group

Ads

--

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा जलदगतीने तपास करून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी*शिवसेनेतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन*

By Sarkar Maza

July 16, 2026 12:46 pm

Ads

चंद्रपूर :- उर्जानगर कोंडी वॉर्ड क्र. 5 येथील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 52 वर्षीय नातेवाईकाने वारंवार अतिप्रसंग करून तिला गर्भवती केल्याची घटना घडली असून सदर प्रकरणात आरोपीला पॉक्सो कायद्यांतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करीत त्याला अटक करण्यात आले असल्यामुळे आरोपीस फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून कमाल शिक्षा देणे आणि पीडित मुलीला वैद्यकीय मदत व पुनर्वसनाची मदत देणे तसेच सदर परिक्षेत्रात जनजागृती करण्याची मागणी शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख तथा शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष दशरथ पारखी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष्य नोपाणी यांना निवेदनाद्वारे करून या घटनेचा तीव्र निषेध देखील करण्यात आला.

चंद्रपूर जिल्ह्यातील उर्जानगर ग्रामपंचायत हद्दीतील वॉर्ड क्र. 5 कोंडी येथे एक अत्यंत निंदनीय व हृदयद्रावक घटना घडली असून येथील 52 वर्षीय आरोपी रवी फाले यांनी आपल्याच नातेवाईकाच्या शिक्षणासाठी विश्वासाने पाठवलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अतिप्रसंग करून तिला गर्भवती केले.

पोटदुखीमुळे मुलीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता ती 2 महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली असता दुर्गापूर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी रवि फाले विरुद्ध पॉक्सो कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले.

परंतु सदर गुन्हा हा नातेवाईकांकडून झालेला विश्वासघात असून संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारा आहे. अशा आरोपींना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत. तसेच पीडित अल्पवयीन मुलीच्या भविष्याचा विचार करून तिला सर्वतोपरी मदत मिळणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून दोषारोपपत्र तातडीने न्यायालयात दाखल करून सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस पॉक्सो कायद्यानुसार कमाल शिक्षा देवून पीडित मुलीला वैद्यकीय मदत, मोफत उपचार, समुपदेशन व शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा. आणि पीडित कुटुंबाच्या सुरक्षेची योग्य ती व्यवस्था करावी.

तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी जिल्ह्यात व उर्जानगर परिसरात जनजागृती मोहीम राबवण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

यावेळी शिवसेना महिला आघाडी बल्लारपूर संघटिका तथा राष्ट्रीय हिंदू महासभेच्या महिला जिल्हाध्यक्ष क्रिष्णाताई सुरमवार, राष्ट्रीय हिंदू महासभेच्या महिला जिल्हा महासचिव सुषमाताई वारजुरकर, जिल्हा सचिव संध्याताई तुरारे, शिवसैनिक करण कोलगुरी, निखिल सुरमवार उपस्थित होते.

Related Article

अनभोरा गावात अवैध दारू विक्री पुन्हा चर्चेत? पूर्वी कारवाई झालेल्या व्यक्तींची नावे पुन्हा समोर; नागरिकांचा संताप, पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी

अकोला एमआयडीसीतबनावट गुटखा कंपनी वर कारवाई पंचनामा सुरू, आरोपींवर कायदेशीर कारवाई लवकरच

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा जलदगतीने तपास करून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी*शिवसेनेतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन*

“मुर्तिजापूर शहर पोलिसांची आणखी एक उल्लेखनीय कामगिरी; चोरीतील ₹72,300 चा सोन्या-चांदीचा मुद्देमाल फिर्यादीला परत”

कृषिमंत्र्यांच्या आढावा बैठकीत अकोल्याचा मुद्दा गाजला; आमदार हरीश पिंपळे यांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरली

मुर्तिजापूरच्या FIR मधील ‘RP’ कोण? शहरात एकच खळबळ; अज्ञात पांढरपोषाचा शोध लागणार कधी?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!