न्यूज डेस्क दि. ३० : भारतीय संस्कृतीत गायीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे,देशी गायीला राज्यमाता- गोमाता घोषित करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मंत्री श्री. विखे पाटील यांनी सर्व मंत्रिमंडळातील सहकारी मंत्र्यांचे आभार व्यक्त केले.गोशाळांमधील देशी गायींच्या पालन-पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टीकदृष्ट्या अधिक मूल्य आहे. देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्याने ते पूर्ण अन्न आहे. देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान, आयुर्वेद चिकित्सा पध्दतीत पंचगव्याचा वापर तसेच सेंद्रिय शेती पध्दतीत देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे महत्व आहे.राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ अशा जाती आहेत. वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्वामुळे गायीला कामधेनू संबोधले जाते. परंतू मागील काही काळापासून देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे. यामुळे देशी गायींचे संगोपन व संवर्धन करणे गरजेचे असल्याने देशी गायींच्या पालनपोषण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने देशी गायीला यापुढे राज्यमाता- गोमाता घोषित करण्यास मान्यता दिली. राज्यात देशी गायीला विशेष दर्जा दिल्याने देशी गायीच्या गोवंश संवर्धनास प्रोत्साहन मिळणार आहे.देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदानराज्यातील गो शाळांमधील देशी गायींच्या पालन-पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने, हा निर्णय घेण्यात आला. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा गोशाळा पडताळणी समिती असेल. २०१९ मधील २० व्या पशु गणनेनुसार देशी गायींची संख्या ४६ लाख १३ हजार ६३२ इतकी कमी असल्याचे आढळून आले आहे. ही संख्या १९व्या पशुगणनेशी तुलना करता २०.६९ टक्क्यांनी कमी झाली आहे.
- वीज आणि पशुधन : संरक्षणाचे प्रभावी उपायShareराज्यात सध्या अवकाळी पावसाचे आणि वादळी वाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे आणि यामुळे वीज पडण्याच्या घटनांमध्येही ... Read more
- पीकेवी मध्ये प्रकल्पग्रस्त साठी विशेष मुहिमShareदिनांक २१ – अकोला – भुमिपुत्रांना न्याय देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या आस्थापनेवरील, प्रकल्पग्रस्त ... Read more
- चीन पाकिस्तानची भाषा काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष बोलून सैनिकांचे मनोबल तोडण्याचं काम करत आहे – आमदार सावरकरShareदिनांक २१ – अकोला – चीन पाकिस्तानची भाषा काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष बोलून सैनिकांचे ... Read more
- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या खेळाडूची राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी!Shareदिनांक २१ – अकोला – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विकासात क्रीडा प्रकार महत्त्वाची भूमिका बजावतात, ज्यामुळे शारीरिक, ... Read more
- नवीन तापडिया नगर उड्डाणपूलचे काम निकृष्ट दर्ज्याचे उद्घाटनापूर्वीच उड्डाणपूलाला भेगा – शिवसेनेचा(उबाठा) संताप, शिवसेनेचे स्पष्ट विधान : ‘भ्रष्टाचार थांबवा, काम पुन्हा करा’Shareदिनांक २१ – अकोला – न्यू तापडिया नगरमध्ये गेल्या सहा-सात वर्षांपासून बांधण्यात येत असलेला रेल्वे ... Read more
- पोलीस प्रशासनाने दखल घेऊन असामाजिक तत्त्वावर वचक बसवावा- आमदार रणधीर सावरकरShareदिनांक – २१ – अकोला – अकोला शहरामध्ये वाढत्या चोरी, घरपोडी अवैद्य धंदे, तसेच वीज ... Read more
- भाजपाच्या विकास कामाच्या वर आपला झेंडा लावण्याचा प्रकार आमदार साजीद खान पठाण यांनी करू नये – पूर्व महापौर विजय अग्रवाल यांनी लावला आरोपShareदिनांक 21 -अकोला(प्रतिनिधी) – भाजपा लोकप्रतिनिधी व अकोला शहराच्या सुखदुःखात सहभागी होणारे लोकप्रिय नेते स्वर्गीय ... Read more
- वासुदेव महल्ले यांची राज्यस्तरीय ‘कृषिरत्न’ पुरस्कारा साठी निवड.Share शेतीपूरक दुग्धउद्योगातील योगदानाची राज्यस्तरीय पातळीवर दखल. २४ मे रोजी शेताच्या बांधावर पुरस्कार वितरण. दिनांक ... Read more
- इंस्टाग्रामवर जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला अटकShareदिनांक २० – अकोला – सोशल मीडियावर प्रक्षोभक धार्मिक पोस्ट टाकून तणाव निर्माण करण्याचा कट ... Read more
- उर्दू शिक्षक संघटनेने विद्यार्थी बख्तियार खानचा सत्कारShareदिनांक – २० – अकोला – स्थानिक शाळेत शिकणारा बख्तियार बाबर खान दिलदार खान नुकताच ... Read more
- प्रशासकीय बदलीसाठी आज होणार सुनावणी.Shareअकोला – दिनांक २० – जयप्रकाश मिश्रा (प्रतीनिधी) -एप्रिल महिन्यानंतर सर्व विभागांमध्ये बदलीची प्रक्रिया सुरू ... Read more
- डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा – प्रभू गौर गोपाल दासShareमुंबई, : धकाधकीच्या आणि डिजिटल युगात माणसं जरी एकमेकांच्या संपर्कात असली, तरी मनाने दूर जात असल्याचे ... Read more
- घरच्या घरी पहा बियाण्याची उगवणक्षमता…!!Shareखरीप हंगाम जवळ आला की शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू होते. उत्पादनात भरघोस वाढ व्हावी, यासाठी ... Read more
- कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी खासगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक Shareखासगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी ३१ मे पर्यंत करण्याचे आवाहन मुंबई, दि. : कामाच्या ... Read more
- अल्पसंख्याक समुहातील विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणाची संधीShareअमर तळोकार (प्रतिनिधी ) – दिनांक १९ – मुंबई – अल्पसंख्याक समुहाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध ... Read more
- सहकार क्षेत्रातील सपकाळ यांचे योगदान सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल : आमदार सावरकरShareदिनांक १९ – अकोला – अकोल्याच्या विकासामध्ये तसेच जिल्ह्याच्या सहकार सामाजिक, आर्थिक शैक्षणिक आरोग्य सेवेमध्ये ... Read more
- शहर कोतवाली पोलिसांची तत्परता – महिलेच्या हरवलेल्या मंगळसूत्राचा शोधShareदिनांक १९ – अकोला – पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावताना अनेक वेळा पोलिसांची परिस्थिती कठीण होते, ... Read more
- साहित्य विहार संस्थे तर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय मराठी वाड्मय पुरस्कारांसाठी साहित्याचे आवाहनShareदिनांक १८ – अकोला साहित्य विहार संस्थेतर्फे साहित्य क्षेत्रातील मानाचे प्रथितयश पुरस्कार दिले जाणार असून ... Read more
- बार्शीटाकळी येथे मोठ्या भाजप नेत्यांचा नेतृत्वात सिंदूर ऑपरेशनच्या विजयाचा जल्लोष!Shareदिनांक १८ – बार्शीटाकळी – पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने राबवलेले ऑपरेशन सिंदूर ... Read more
- दिव्यांग वडलाच्या होतकरू विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी मदतीची गरज !Shareदिनांक १८ – अकोला (प्रतिनिधी) – “माझं स्वप्न आहे शिक्षण घेऊन मोठं होण्याचं… पण बाबा, ... Read more
- इंडो पब्लिक स्कूल के छात्रों का सी.बी.एस.सी. बोर्ड दसवी परीक्षा में शानदार प्रदर्शन!Shareस्थानिक अमरावती मे स्थित इंडो पब्लिक स्कूलने सी.बी.एस.ई.बोर्ड परीक्षा मे हर वर्ष की तरह अपनी ... Read more
- सैनिकांच्या कामगिरीला सलाम करण्यासाठी तिरंगा रॅलीचे मुर्तीजापुर शहरात आयोजन Shareदिनांक १८ _ मुर्तीजापुर – जम्मू – काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्यानंतर भारतीय सैन्य ... Read more
- एक सच्चा समाज सेवक – पराग गवई, आज पर्यंत केले ७७ बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार.Shareदिनांक १८ – अकोला – प्रत्येक व्यक्तीला आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्याच्या कुटुंबातील सदस्यांची गरज असते ... Read more
- आरोपिंचा गांजा तस्करी करण्याचा प्रयत्न एसडीपीओ पथकाचा सतर्कते मुळे उधळला गेला डाव.Shareदिनांक १८ – अकोला – अकोला शहरात विक्रीसाठी गांजा आणला जात असल्याची गुप्त माहिती शहर ... Read more