Join WhatsApp group

Ads

अनुसूचित जातींच्या ज्वलंत प्रश्नांवर आवाज; विधिमंडळ समितीकडे विविध मागण्यांचे निवेदन

By Sarkarmzanews

August 19, 2026 5:34 pm

Ads

अकोला, दि. १९ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र विधिमंडळ अनुसूचित जाती कल्याण समिती अकोला दौऱ्यावर असताना अनुसूचित जाती समाजाच्या विविध ज्वलंत प्रश्नांकडे समितीचे लक्ष वेधण्यासाठी निवेदने सादर करण्यात आली.

या निवेदनामध्ये प्रमुख दोन मागण्या करण्यात आल्या. अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी, तसेच याबाबत राज्य शासनाला आवश्यक शिफारस करावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील सर्व समाजघटकांच्या उन्नतीसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची समीक्षा करण्यात यावी.

या योजनांचा लाभ नेमक्या कोणत्या समाजघटकांना आणि किती प्रमाणात मिळाला, याबाबत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांची जातनिहाय ‘श्वेतपत्रिका’ प्रसिद्ध करण्यासाठी शासनाला सूचना करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय लहुशक्तीचे अध्यक्ष परिमलदादा कांबळे, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ तायडे, सतुरसेना प्रमुख संजयभाऊ धनाडे, वाल्मिकी युवा मंचचे उमेशभाऊ लखन, तसेच प्रकाशभाऊ तायडे, योगेशभाऊ सोनोनें, अमरभाऊ इंगळे, योगेशभाऊ भालेराव यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!