Join WhatsApp group

Ads

“अजित पवार विमान अपघात प्रकरणी चौकशीवर प्रश्नचिन्ह; रोहित पवारांचे वक्तव्य”

By Sarkarmzanews

February 10, 2026 6:01 pm

Ads

दिनांक १० | मुंबई

२८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनाला आज १३ दिवस पूर्ण झाले असले, तरी या घटनेच्या चौकशीला अद्याप गती आलेली नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे युवा नेते रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या अपघाताबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले.

रोहित पवार म्हणाले की, “राज्यातील एक मोठा आणि प्रभावी राजकीय नेता अशा प्रकारे आपल्यातून निघून जातो, ही घटना अत्यंत गंभीर आहे. हा केवळ अपघात होता की यामागे काही वेगळा कट आहे, याची स्पष्ट उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत. याच हेतूने आम्ही हे प्रश्न मांडत आहोत.”

पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी अजित पवार यांना ऐनवेळी विमान प्रवास करण्याची गरज का भासली, याचा संपूर्ण घटनाक्रमही उलगडून सांगितला. तसेच या प्रकरणात घातपाताची शक्यता फेटाळून लावता येत नाही, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.

“या घटनेमागे घातपात आहे का, याबाबत मलाही शंका आहे,” असे स्पष्ट शब्दांत सांगत रोहित पवार यांनी एका अनुभवाचा उल्लेख केला. ते म्हणाले, “आम्ही या विषयावर अभ्यास करत असताना सेक्युरिटी क्षेत्रात काम करणारा एक व्यक्ती माझ्याकडे आला. त्याने मला इस्त्रायल आणि मोसादचा संदर्भ देत एक पुस्तक वाचण्यास सांगितले. त्या पुस्तकात डेगन नावाच्या व्यक्तीच्या हत्येच्या तंत्राबाबत उल्लेख आहे. ‘एखाद्या व्यक्तीला संपवायचे असेल, तर त्याच्या चालकाला लक्ष्य केले की विषय संपतो,’ असे त्या ठिकाणी नमूद असल्याचे त्याने सांगितले.”

रोहित पवार यांनी अजित पवार यांचा अपघात नसून घातपात असल्याची शंका उपस्थित केली आहे. तसेच या घातपातासाठी जबाबदार कोण असू शकत यावरही रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. रोहित पवार यांनी 3 नावे सांगितली आहेत.

अजित पवार यांचा बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातावर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. त्यानंतर आज आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अपघातावर भाष्य केले आहे. रोहित पवार यांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शंका उपस्थित केली आहे. तसेच या घातपातासाठी जबाबदार कोण असू शकतं यावरही रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. रोहित पवारांनी थेट नावे घेतल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

या तिघांवर रोहित पवारांना शंका

रोहित पवार यांनी म्हटले की, ‘हा अपघात होता की घात होता? असा प्रश्न तुम्ही केला. सर्वांची शंका आहे की हा घात होता. आजच्या सादरीकरणावरून समजेल की मी प्रत्येक गोष्ट सांगितली. एक एक गोष्ट घडली. कशी घडली. कुणाचं विमान होतं. ही सर्व माहिती तुम्हाला दिली. कुणावर शंका घेतोय असं नाही. मी फक्त वस्तुस्थिती सांगितली. याबाबत व्हिएसआर विमान कंपनी, अॅरो कंपनी आणि कपूर नावाचा पायलट यावर आमची शंका आहे. या सर्व चर्चेत अॅरो नावाच्या कंपनीने व्हिएसआरचं विमान हायर केलं होतं. सरकारी जीआर नुसार घेतलं होतं. पवार नावाचा माणूस अॅरोचा हँडलर आहे. त्याने व्हिजिबिलीटी क्लिअर असल्याचं म्हटलं आहे. ही कंपनी बऱ्याच राज्यात काम करत आहे. या कंपनीचा राजकीय नेत्यांशी संबंध आहे.’

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, डीजीसीवर विश्वास आहे. सरकारवर आरोप नाही. कुणावर आरोप नाही. अशा गोष्टी घडल्या असतील अशी शंका आहे. पोलिसांना एअरपोर्टवर परवानगी नसते. सीआयडी चौकशी करत नाही. त्यात एक्सपर्ट ओपिनियन हवं. त्यामुळे बाहेरच्या कंपन्या घ्या. तसेच ब्लॅक बॉक्समधील रेकॉर्डिंग, संपूर्णपणे परिवारातील एका व्यक्तीला एक्सपर्ट बरोबर बघण्याची संधी द्यावी. ही सरकारला विनंती आहे. सीआयडीवर आक्षेप घेत नाही. कधी कधी एखाद्या एजन्सीचं नाव दिल्यावर लोकांना वाटतं लय भारी काम. पण या टिपिकल घटनेबद्दल ते चांगलं काम करणार नाही. हे त्यांचं एक्सपर्टीज नाही. हृदयाचा आजार असेल तर हृदयाच्या डॉक्टरकडे जावं लागतं. डोळ्याच्या नाही.

काही गोष्टी दाबल्या जात आहेत – रोहित पवार

पुढे बोलताना रोहित पवार यांनी म्हटले की, ‘काही प्रमाणात राजकीयदृष्टीकोनातून नाही, व्यावहारिक दृष्टीकोनातून काही गोष्टी दाबल्या जात आहे. मुंबई एअरपोर्टचं सीसीटीव्ही फुटेज घेतलं नाही. बारामतीचं घेतलं. स्लो चौकशी सुरू आहे. प्रमुख नेता मृत्यूमुखी पडतो. चौकशी संथ होत असेल तर या चौकशीत गती नाही. त्यात मॅन्यूप्युलेशन केलं तर घातक होईल. व्हिएसआरच्या सर्व सर्व्हिसेस कॅन्सल करा. व्हिआयपीला धोका होऊ शकतो. सर्वांना ताब्यात घ्या.’

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!