Join WhatsApp group

Ads

पुंडलिक बाबा गौरक्षण येथे २१ दाम्पत्यांच्या हस्ते पार्थिव शिवलिंग रुद्राभिषेक; बगलामुखी माता हवन उत्साहात

By Sarkarmzanews

August 26, 2026 10:48 am

Ads

मूर्तीजापूर : शहरातील पुंडलिक बाबा गौरक्षण येथे धार्मिक व भक्तिमय वातावरणात २१ दाम्पत्यांच्या हस्ते पार्थिव शिवलिंग रुद्राभिषेक तसेच बगलामुखी माता हवन विधी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी परिसरात मंत्रोच्चार, धार्मिक विधी आणि भजन-कीर्तनामुळे आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.नलखेड (उज्जैन) येथील माता बगलामुखी मंदिराचे महंत महाराज कुलदीपजी महाराज व त्यांच्या शिष्यवृंदाच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक विधी पार पडले. यावेळी भजन गायक कुमार योगेश यांनी शिवकीर्तन सादर करून उपस्थित भाविकांना भक्तिरसात चिंब केले.

रुद्राभिषेकाच्या विधीमध्ये २१ दाम्पत्यांनी सहभागी होत भगवान महादेवाची विधिवत पूजा-अर्चना केली. त्यानंतर बगलामुखी माता हवन विधीही मंत्रोच्चारात पार पडला. या धार्मिक कार्यक्रमासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान भाविकांनी भगवान महादेव तसेच बगलामुखी माता यांचे दर्शन घेतले. धार्मिक विधी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आयोजक, सेवेकरी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.

या संपूर्ण आयोजनाला बाबा पुंडलिक गौरक्षण संस्थेचे विशेष सहकार्य लाभले. भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने पुंडलिक बाबा गौरक्षण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!