Join WhatsApp group

Ads

-

दारूच्या भट्टीवर पोलिसांचा छापा — ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त

By Sarkarmzanews

July 22, 2025 3:47 pm

Ads

अकोला (दि.२२ जुलै) : नायगाव परिसरात देशी दारूची बेकायदेशीर भट्टी चालवल्याची गुप्त माहिती अकोट फैल येथील डीबी पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी बुधू नौरंगाबादी यांच्या दारू भट्टीवर धाड टाकली.

या कारवाईत पोलिसांनी सुमारे ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी ३०० लिटर सडवा महुआ, १०० लिटर देशी दारू, आणि सुकामेवा असा मोठ्या प्रमाणात दारू बनवण्याचा साहित्य जप्त केले.

जिल्ह्यात बेकायदेशीर दारू उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विशेषतः सडवा महुआपासून दारू तयार करण्याचा व्यवसाय काही ठिकाणी उघडपणे सुरू आहे.

उत्पादन शुल्क विभागावर कारवाईची जबाबदारी असली तरी प्रत्यक्षात पोलिसच सातत्याने कारवाई करत असल्याचे चित्र आहे.

ही कारवाई शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस निरीक्षक शेख रहीम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.या कारवाईत पीएसआय तनुजा खोब्रागडे, अनिस पठाण, योगेश काटकर, संतोष चिंचोलकर, हर्षल श्रीवास, इम्रान शाह, आणि गिरीश तिडके यांनी सहभाग घेतला.पोलिसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!