Join WhatsApp group

Ads

--

चायनीज मांजाच्या धोक्याविरुद्ध पोलीस प्रशासन सज्ज; नागरिकांच्या वाहनांवर संरक्षण आर्च

By Sarkarmzanews

January 10, 2026 7:06 pm

Ads

मुर्तिजापूर : दिनांक १०: येणाऱ्या मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर चायनीज मांजामुळे होणाऱ्या गंभीर अपघातांना आळा घालण्यासाठी मुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने विशेष रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत सेफ्टी आर्च अभियान राबविण्यात आले.

“सडक सुरक्षा – जीवन सुरक्षा” या ब्रीदवाक्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सदर अभियान पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशाने हे विशेष अभियान राबविण्यात आले आहे.

शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली दुचाकीस्वार नागरिकांच्या वाहनांवर तारांचे (सेफ्टी आर्च) संरक्षण कवच बसविण्यात आले.

चायनीज मांजामुळे मान, चेहरा, डोळे तसेच घसा कापला जाण्याच्या अनेक घटना राज्यात घडल्या असून काही ठिकाणी निष्पाप नागरिकांचा मृत्यू देखील झाला आहे.

या पार्श्वभूमीवर कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी हा प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आला आहे.चायनीज मांजा हा अत्यंत धारदार असून तो मानवी त्वचेसाठी घातक आहेच, शिवाय तो पक्ष्यांसाठी प्राणघातक, तसेच विद्युत तारांमध्ये अडकून वीजपुरवठा खंडित होण्यास कारणीभूत ठरत आहे.

अनेक वेळा दुचाकीस्वारांच्या गळ्याभोवती मांजा गुंडाळल्याने गंभीर जखमा, रक्तस्राव व कायमस्वरूपी अपंगत्व येण्याच्या घटना समोर आल्या आहेत.

या अभियानाद्वारे पोलीस प्रशासनाने केवळ कारवाईपुरते न थांबता सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य दिले आहे.

दुचाकी वाहनांवर सेफ्टी आर्च बसविल्याने मांजा थेट चालकाच्या मानेपर्यंत पोहोचणार नाही, त्यामुळे अपघाताची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.पोलीस प्रशासनाने यावेळी नागरिकांना चायनीज मांजाचा वापर टाळण्याचे आवाहन केले असून, कायदेशीर बंदी असलेल्या या मांजामुळे स्वतःसह इतरांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, याची जाणीव ठेवण्याचे सांगितले आहे.

मुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून, अशा प्रकारचे प्रतिबंधात्मक व जनहिताचे उपक्रम राबविल्यास रस्ता अपघात आणि जीवितहानी रोखण्यास निश्चितच मदत होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

या अभियानात ठाणेदार अजित जाधव व शहर पोलीस स्टेशन मधील सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!