Join WhatsApp group

झाडे लावणे आणि झाडे जगवा ही काळाची गरज तहसीलदार सुरेश कव्हळे, राजस्व अभियानांतर्गत पाधन रस्त्यावर वृक्ष लागवडीचा अभिनव उपक्रम

Photo of author

By Sarkarmzanews

Share

बोरगाव मंजू :३ ऑगस्ट : बोरगाव मंजू येथे राजस्व अभियानांतर्गत पांदण रस्त्यावर वृक्ष लागवडीचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे.

त्यावेळेस अकोला तहसीलदार. सुरेश कव्हळे यांनी म्हटले की झाडे लावणे आणि जगवणे ही काळाची गरज आहे.

आपल्याला कोरोना सारख्या महामारी मध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने त्यावेळेस आपल्याला ऑक्सिजन मिळत नव्हते आणि आपल्याला फुकट ऑक्सिजन मिळत असल्याने आपल्याला त्याची किंमत नव्हती त्यामुळे झाडे लावणे आणि जगवणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला कोरोना सारख्या महामारीने आपल्याला दाखवून दिले आहे.

झाडे लावणे आणि झाडे जगवणे ही सध्या काळाची गरज असल्याचे एका छोटेखानी कार्यक्रमांमध्ये तहसीलदार अकोला सुरेश कव्हळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्या वेळेस बोरगाव मंजूचे महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी हरिहर निमकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव म्हणजे येथे जुना कानशिवनी रस्ता या शेत रस्त्याच्या पांदण रस्त्यावर दोन्हीकडे गड्डे करून शेकडो झाडे लावण्यात आली आहेत.

त्या मध्ये मंडळ अधिकारी नंदकिशोर माहोरे तलाठी सुनील कल्ले,पुरुषोत्तम गायकवाड ,प्रवीण चव्हाण, अंजली इंगोले ,अर्चना चव्हाण, सुनिता दातकर ,संघमित्रा सदाशिव राधा राठोड ,संतोष ठाकूर ,अमोल कुंभारे ,यांच्यासह गावातील सर्व पक्षाचे पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते तसेच गावकऱ्यांचे हस्ते वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला.

बातमी – देवानंद मोहोड (बोरगांव मंजु, प्रतिनिधी)


Share

Leave a Comment

error: Content is protected !!