Join WhatsApp group

Ads

-

पी.एम.श्री स्व. रामदास भैया दुबे न.प.शाळेत भव्य क्रीडास्पर्धा आयोजन

By Sarkarmzanews

January 16, 2025 7:25 pm

Ads

दिनांक १६ : मुर्तीजापुर : पीएमश्री स्कूल स्व. रामदास भैय्या दुबे नगरपरिषद प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा आयएसओ मानांकन प्राप्त डिजिटल स्कूल मध्ये आज दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी शाळेत भव्य क्रीडास्पर्धा आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी खेळाविषयी आवड निर्माण व्हावी त्यांच्यातील सुप्त गुण जागृत व्हावे यासाठी क्रीडास्पर्धा अंतर्गत रनिंग, लिंबू चमचा, पोत्यातील उड्या, बेडूक उड्या लंगडी, खो खो इत्यादी खेळाचे आयोजन करण्यात आले.

यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप झोडपे सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबुलाल यादव शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य श्री विशाल अंबळकार सर, सौ अर्चना मोरे मॅडम, श्री दीपक हांडे, सौ अश्विनी अंबळकर, सौ रक्षदा येवोकर, सौ अस्वीता गुल्हाने, सौ वर्षा हांडे,श्रीमती अनिताताई देवके, सौ सुषमा बाळापुरे यांनी परिश्रम घेतले..

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!