Join WhatsApp group

धनादेश अनादर प्रकरणातील आरोपींना सोडण्याचे आदेश

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक २३ : अकोला : अकोल्यातील एमआयडीसी येथील अॅडव्हान्स पेस्ट साईड कंपनीच्या वतीने निगोशिएबल कायद्याच्या कलम १३८ अंतर्गत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेत असे म्हटले होते की उत्तर प्रदेशातील किसान फूड स्टोअरचे संचालक मोहम्मद अमीन यांनी त्यांच्या कंपनीकडून उधारीवर साहित्य घेतले होते.

या साहित्याची ३ लाख ३६ हजार रुपयांची थकबाकी भरण्यासाठी आरोपींनी धनादेश दिला होता . जेव्हा हा धनादेश बँकेत जमा करण्यात आला तेव्हा आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो परत करण्यात आला. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, आरोपींच्या वतीने बाजू मांडणारे वकील तौसिफ नियाझी, चेतन दुबे, समीर खान यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपी आणि कंपनीमध्ये व्यावसायिक व्यवहार आहे आणि ज्या धनादेश वर थकबाकीची रक्कम आहे.

दाखवलेले धनादेश कंपनीला जारी केले आहे. ते जामीन म्हणून देण्यात आले होते आणि ज्या वेळी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, त्या वेळी आरोपीच्या बॅलन्स शीटनुसार, धनादेश रक्कम थकबाकी नव्हती. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला निर्दोष ठरवून त्याची सुटका करण्याचे आदेश दिले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!