Join WhatsApp group

Ads

अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल मनसेतर्फे बालग्राम आश्रमात फळे वाटप; मनसे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

By Sarkar Maza

May 25, 2026 6:54 am

Ads

पनवेल |प्रतिनिधी |श्रीनाथ दत्तात्रेय लाड: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष माननीय श्री. अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेलमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर पनवेल मनसे महानगराध्यक्ष सौ. स्वरूपा सुर्वे यांच्या वतीने खांदा कॉलनी येथील ‘बालग्राम आश्रमातील’ मुलांना फळे वाटप करून हा वाढदिवस अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक भावनेतून साजरा करण्यात आला.

अमित ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या मनसे सैनिकांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही कोणताही डामडौल न करता गरजू आणि अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याला प्राधान्य दिले. आश्रमातील लहान मुलांना फळे वाटप करताना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

याप्रसंगी मनसेच्या अनेक प्रमुख महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. यामध्ये रायगड जिल्हा सचिव सौ. स्नेहल बागल, पनवेल महानगर सचिव आशिता पाटील, नवीन पनवेल सचिव सौ. मनीषा देशमुख, विभाग अध्यक्ष सौ. सोनिया विकास, मनसे वाहतूक सेना रायगड जिल्हा संघटक श्री. सचिन जाधव आणि पनवेल उपशहर अध्यक्ष रोहन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

“अमित साहेबांचा वाढदिवस हा आमच्यासाठी उत्साहाचा दिवस आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांना आणि विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळत आहे. त्यांच्या वाढदिवशी या चिमुकल्यांना आनंद देऊन आम्हाला आत्मिक समाधान लाभले,” अशी प्रतिक्रिया या प्रसंगी मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

मनसेच्या या सामाजिक उपक्रमाचे खांदा कॉलनी परिसर आणि सामाजिक वर्तुळातून कौतुक होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!