Join WhatsApp group

Ads

पनवेलमधील नवनियुक्त शिवसेना (UBT) पदाधिकाऱ्यांनी घेतली पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची ‘मातोश्री’ वर घेतली सदिच्छा भेट…

By Sarkar Maza

May 12, 2026 6:45 pm

Ads

पनवेल:कळंबोली प्रतिनिधी- (श्रीनाथ दत्तात्रेय लाड)


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पनवेल विधानसभा क्षेत्रातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. आपल्या नियुक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि पुढील कार्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती.

या भेटीदरम्यान नवनियुक्त जिल्हाप्रमुख श्री. दीपक निकम, उपजिल्हाप्रमुख श्री. रामदास पाटील आणि महानगरप्रमुख श्री. समाधान काशीद यांनी उद्धव ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. यावेळी उद्धव ठाकरेंनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि पनवेल विधानसभा क्षेत्रात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. आगामी काळातील आव्हाने पेलण्यासाठी आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी त्यांनी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छाही दिल्या.

या महत्त्वपूर्ण प्रसंगी पक्षाचे उपनेते श्री. बाळ माने, उपनेते श्री. बबन पाटील, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख श्री. प्रसाद भोईर, आणि सहसंपर्कप्रमुख श्री. अनिल चव्हाण उपस्थित होते. तसेच, पनवेल महानगरपालिकेच्या शिवसेना गटनेत्या व महिला संघटिका सौ. लीना अर्जुन गरड यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारीही या सदिच्छा भेटीला हजर होते.

या भेटीमुळे पनवेलमधील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ‘नवे पदाधिकारी आणि नवा उत्साह’ असे चित्र आता पनवेलमध्ये पाहायला मिळत आहे.

Related Article

अकोल्यात ‘नकली नोटांचा’ मोठा खेळ उघड! LCB च्या धाडीत ९७ हजारांच्या बनावट नोटा जप्त; मूर्तिजापूर कनेक्शन समोर

गुटखाबंदीचा फज्जा? बोरगाव मंजूत आजही सर्रास गुटखा विक्री; बनावट गुटखा रॅकेटचा संशय, प्रशासन झोपेत?

मूर्तिजापूर–बोरगाव–अकोला असा बनावट गुटखा रॅकेटचा प्रवास? कारवाईनंतर अनेक प्रश्न अनुत्तरित

कारंज्यात पेट्रोल-डिझेल चोरीचा गोरखधंदा? नॅशनल ढाब्यावर टँकरमधून इंधन उतरविण्याची चर्चा; स्फोटाच्या धोक्याने नागरिकांमध्ये चिंता

बेटा नंबरी… बाप दस नंबरी? अकोल्यातील बनावट गुटखा रॅकेटवर सलग दुसरी धडक कारवाई! अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे ऑपरेशन प्रहार

अनभोरा गावात अवैध दारू विक्री पुन्हा चर्चेत? पूर्वी कारवाई झालेल्या व्यक्तींची नावे पुन्हा समोर; नागरिकांचा संताप, पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!