Join WhatsApp group

Ads

-

भव्य नेत्र शस्त्रक्रिया व रूग्ण तपासणी शिबीराचा गरजु रूग्णांनी घेतला लाभ – शिबिरात दोनशे रूग्णांची तपासणी व चश्मा वाटप

By Sarkarmzanews

January 9, 2025 8:06 pm

Ads

मुर्तिजापूर दि.९ : येथील महाराष्ट्रीयन हिंदी भाषी समाज बहुउद्देशीय संस्थेचे वतीने तसेच दृष्टी धारण आणि अंधत्व निवारण कार्यक्रमा अंतर्गत इनर व्हिल क्लब अकोला व दम्माणी नेत्र आय हॉस्पिटल अकोला यांच्या सहकार्याने मुर्तिजापूर शहरातील संत राधे राधे महाराज सत्संग भवन भक्तीधाम मंदिर पटवारी काॅलनी समता नगर येथे भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चश्मा वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये जवळपास दोनशे रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.यामध्ये गरजु असलेल्या रूग्णावर दम्माणी नेत्र रूग्णालय आपातापा रोड अकोला येथे दिलेल्या तारखेनुसार शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्रीयन हिंदी भाषी समाज बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक रतनलाल महाजन तसेच उद्घाटक म्हणून दम्माणी नेत्र रूग्णालयाचे व्यवस्थापक व संचालक सभापती शुक्ला तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्रीयन हिंदी भाषी समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे , माजी नगरसेवक इब्राहिम कासम, समाजसेवक संजय जयस्वाल,घानीवाला,माजी नगरसेविका सौ संध्याताई दुबे, समाजसेवक कैलास महाजन, माजी नगरसेवक भारत जेठवाणी,डॉ.दत्ता पवार, डॉ.सौरभ इंगोले,माजी नगरसेवक देवीदास गोळे, डॉ.गौरव कैलास महाजन,सौ
राधा तिवारी,सौ.अनिता देवीवर , संभाजी ब्रिगेड विभागीय कार्याध्यक्ष संजय भोलाशंकर गुप्ता,संयोजक अशोक दुबे, जवाहरलाल पातालबंसी , डॉ अर्पण दुबे आदींची उपस्थिती होती.महाष्टीयन हिंदी भाषी समाज बहुउद्देशीय संस्थेचे वतीने दरवर्षी दम्माणी नेत्र रूग्णालय तथा दृष्टी धारण आणि अंधत्व निवारण कार्यक्रमा अंतर्गत इनर व्हिल क्लब अकोला यांच्या सहकार्याने भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चश्मा वाटप शिबीराचे आयोजन करण्यात येते.

यंदाही दि.९ जानेवारी रोजी सकाळी १०ते ३ वाजेपर्यंत दम्माणी नेत्र रूग्णालयाचे व्यवस्थापक व संचालक सभापती शुक्ला यांनी व त्यांच्या डाॅ.दत्ता पवार व डॉ.सौरभ इंगोले यांनी गरजु रूग्णांची तपासणी केली. शिबीरामध्ये शहरासह ग्रामीण भागातील रूग्ण तपासणी करीता मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी अति आवश्यक असलेल्या रूग्णावर दम्माणी नेत्र रूग्णालय आपातापा रोड अकोला येथे दिलेल्या तारखेनुसार शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची सुरूवात भगवान श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.मंचावर सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.यावेळी दम्माणी नेत्र रूग्णालयाचे व्यवस्थापक व संचालक सभापती शुक्ला यांनी आपल्या भाषणात सांगितले की महाराष्ट्रीयन हिंदी भाषी समाज बहुउद्देशीय संस्थेचे वतीने आयोजित कार्यक्रमात दरवर्षी मोठ्या संख्येने रूग्ण तपासणी करीता येतात.हा एक बहुमुल्य कार्यक्रम आहे.मी व माझे सहकारी डाॅकटर देखील रूग्णांची तपासणी करून त्यांना योग्य मार्गदर्शन करतात ज्यांना अतिशय आवश्यक आहे अशा रूग्णांची तपासणी करून शस्त्रक्रिया करण्यात मदत करतात.असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

त्यानंतर सर्व उपस्थित रूग्णांची तपासणी सुरू करण्यात आली यामध्ये दोनशे रूग्णांची तपासणी करण्यात आली व ज्यांना अतिशय आवश्यक असलेल्या रूग्णावर दम्माणी नेत्र रूग्णालय आपातापा रोड अकोला येथे दिलेल्या तारखेनुसार शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे माजी नगराध्यक्ष तथा महाराष्ट्रीयन हिंदी भाषी समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी सांगितले आहे.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन समाजसेवक संजय जयस्वाल यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाराष्ट्रियन हिंदी भाषी समाज बहुउद्देशीय संस्थेचे शालिकराम यादव, पप्पू शुक्ला, संभाजी ब्रिगेड विभागीय कार्याध्यक्ष संजय भोलाशंकर गुप्ता,रमेश गुप्ता, संतोष दुबे,जगदीश,कुंभेकर, डॉ अर्पण दुबे, शिवदास तिरकर,अनंता पांडे,सनत दुबे,विशाल गुप्ता,प्रेम गुप्ता, जवाहरलाल पातालबंसी, मुन्ना गुप्ता, गजानन दुरतकर, हरी प्रसाद दुबे,दिपक हांडे, डॉ.प्रविण पालिवाल, डॉ.पवन पातालबंसी,अशोक वाघ,नितीन उपाध्याय,सौ.अनीता देवीकर,संजय जयस्वाल, पत्रकार प्रकाश श्रीवास, रोहीत सोळंके,अजय प्रभे तसेच महाराष्ट्रीयन हिंदी भाषी समाज बहुउद्देशीय संस्थेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!