Join WhatsApp group

Ads

नाशिक जिल्हा सेपक टकरा असोसिएशनच्या माध्यमातून व अस्मिता दर्शन महिला मंडळ द्वारा नाशिक शहरात जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेचे आयोजन

By Sarkarmzanews

October 5, 2024 5:01 pm

Ads

नाशिक – नाशिक जिल्हा सेपक टकरा असोसिएशनच्या माध्यमातून व अस्मिता दर्शन महिला मंडळ द्वारा नाशिक शहरात जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातील विविध शाळा- महाविद्यालयातील अनेक महिला व पुरुष खेळाडूंनी सहभाग नोंदविला स्पर्धा अतिशय उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी मा. नगरसेवक रुची कुंभारकर , अखिल भारतीय मराठा महासंघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक कदम, क्रीडा जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, जिल्हा संघटनेचे सचिव दीपक निकमपाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धकांना मान्यवरांनी शुभेच्छा देत नियमित अशा स्पर्धकांचे आयोजन करत राहण्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सुचित केले त्याचबरोबर आमदार महोदयांनी असेच खेळाडूंच्या पाठीशी उभे राहावे जेणेकरून खेळाडूंना अधिकाधिक अधिक प्रगती करण्यासाठी जास्तीत जास्त स्पर्धांची संधी मिळेल व नाशिक जिल्ह्याचे नावलौकिक होईल व खेळाडूंना अनेक क्रीडा प्रकारांमध्ये संधी उपलब्ध करून देणे हे आमदार साहेबांचे काम कौतुकास्पद आहे असे देखील त्यांनी सांगितले त्याचबरोबर पारितोषिक वितरण समारंभासाठी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, सोमनाथ वडजे, संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत बनकर, आनंद खरे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे मुले प्रथम :- ओझर द्वितीय :- एन एस सी सी क्लब तृतीय :- चांदवड प्राईड मुली प्रथम:- एन एस सी सी क्लब द्वितीय:- आडगाव चॅम्पियन्स तृतीय:- नाशिक क्लब

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!