Join WhatsApp group

Ads

नाशिक जिल्ह्याचा तलवारबाजी कॅडेट संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जाहीर

By Sarkar Maza

April 29, 2026 7:37 pm

Ads

नाशिक, दि. २९: नाशिक डिस्ट्रिक्ट फेन्सिंग असोसिएशनच्या वतीने २५ एप्रिल २०२६ रोजी कालिका मंदिर हॉल, जुना आग्रा रोड, मुंबई नाका येथे कॅडेट (१७ वर्षांखालील मुलं व मुली) गटासाठी निवड चाचणी स्पर्धा पार पडली. या निवड प्रक्रियेतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला आहे.

निवड झालेल्या खेळाडूंसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आंतरराष्ट्रीय खेळाडू व महाराष्ट्र क्रीडा मार्गदर्शक अजिंक्य दुधारे, तसेच जय शर्मा, आनंद चकोर, राहुल फडोळ आणि प्रसाद परदेशी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.

जिल्हा संघटनेचे अध्यक्ष दत्ता पाटील आणि छत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे यांच्या हस्ते संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली. हा संघ ३० एप्रिल ते २ मे २०२६ दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.

संघ पुढील प्रमाणे:

ईपी (Epee) – मुलं:विरल मस्के, आदित्य बांगर, अंकुश पाटील, विराज केंद्रे

फॉइल (Foil) – मुलं:विराज केंद्रे, सत्यजित खैरनार, आदित्यराज पवार, विरल मस्के

सेबर (Sabre) – मुलं : सोहम हेकरे, सार्व भट्टा, गौरव शिंदे, साई शिंदे

फॉइल – मुली : मूर्खना संचे, लगदी मोदी, तेजस्विनी राणे, नेहा पाटील

ईपी (Epee) – मुली:अस्मी धामणे, रिधिमा जोगोटिया, रिद्धी दवे, श्रकवी शेटकर

सेबर – मुली :अनखा माळी, माहीम शेख, स्पर्श बत्तीसी, रिद्धी दवे

यावेळी कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अण्णा पाटील, जिल्हा संघटनेचे दीपक निकम, राजू शिंदे तसेच नितीन सुगंधी आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!