Join WhatsApp group

Ads

-

मुर्तिजापूर नगर परिषद निवडणूक २०२५ : प्रभाग ३ मध्ये भाजपचे दुहेरी यश

By Sarkarmzanews

December 21, 2025 12:42 pm

Ads

मुर्तिजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मधून भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. या प्रभागातून भाजपच्या शालिनी राम हजारे यांनी ९८१ मते, तर राहुल गुल्हाने यांनी १०३७ मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला आहे.

दोन्ही उमेदवारांच्या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दरम्यान, आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या एकूण मतांमध्ये

वंचित बहुजन आघाडी – २३३४ मते,

भाजप – १३५१ मते,

मशाल – २०४३ मते

अशी आघाडी–पिछाडीची स्थिती दिसून येत आहे. पुढील फेऱ्यांमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!