Join WhatsApp group

Ads

जिल्ह्यात क्रीडाविश्वाचे केंद्रबिंदू ठरले मूर्तिजापूर; राज्यस्तरीय बॉक्सिंग व शूटिंगबॉल शालेय स्पर्धांचा शुभारंभ

By Sarkarmzanews

January 20, 2026 6:55 pm

Ads

मूर्तिजापूर (जि. अकोला):क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला व जिल्हा क्रीडा परिषद अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग व शूटिंगबॉल क्रीडा स्पर्धा (सन २०२५–२६) चे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात तालुका क्रीडा संकुल, मूर्तिजापूर येथे पार पडले.

oplus_0

सदर स्पर्धा १९ वर्षांखालील मुले व मुली या वयोगटासाठी असून २० ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.स्पर्धेचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार मा. श्री. हरीश पिंपळे हे होते.

oplus_0

प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष हर्षल साबळे, उपविभागीय अधिकारी श्री. संदीप अपार, तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे, जिल्हा शूटिंगबॉल असोसिएशन अकोला सचिव मोहम्मद साकिब, तसेच नगरसेवक भारत जेठवानी व उद्योजक प्रशांत हजारी उपस्थित होते.

oplus_0

यावेळी राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती भक्ती चुंगडे हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच क्रीडा प्रबोधिनीची बॉक्सिंग खेळाडू समीक्षा सोळंके हिने आपल्या दमदार खेळाने विजयी सलामी दिली.

oplus_0

प्रास्ताविक आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक तथा जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. सतीशचंद्र भट्ट यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री. ज्ञानेश टाले यांनी केले. उद्घाटनप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना म्हणाल्या, “तालुक्याच्या ठिकाणी अशा भव्य राज्यस्तरीय स्पर्धा होणे ही अभिमानाची बाब असून भविष्यात यापेक्षाही मोठ्या स्पर्धा येथे होतील.”

oplus_0

अध्यक्षीय भाषणात आमदार हरीश पिंपळे यांनी “माझ्या मतदारसंघात क्रीडा स्पर्धांसाठी निधी कधीही कमी पडू देणार नाही,” अशी ग्वाही दिली.या स्पर्धेत अकोला, अमरावती, नागपूर, नाशिक, लातूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आदी विभागांतील ५६० हून अधिक मुले व मुली सहभागी झाले असून पंच व तांत्रिक अधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

खेळाडूंची निवास व्यवस्था क्वीन्स लँड मंगल कार्यालय, मूर्तिजापूर येथे तर भोजनाची व्यवस्था तालुका क्रीडा संकुल येथे करण्यात आली आहे.उद्घाटन दिनी झालेल्या शूटिंगबॉल सामन्यांमध्ये मुलांच्या गटात नाशिक संघाने नागपूर संघावर २–० असा विजय मिळवला, तर मुलींच्या गटात पुणे संघाने नाशिक संघाला २–० ने पराभूत केले.

oplus_0

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा अधिकारी श्रीमती मनीषा ठाकरे, डॉ. अभिजित फिरके, जिल्हा संघटक राजेश गावंडे, क्रीडा मार्गदर्शक डॉ. नलिनी जाधव, विनोद काळबांडे, निशांत वानखडे, अजिंक्य देवडे, अनुप वर्मा, राजू उगवेकर, गजानन चाटसे, तसेच मूर्तिजापूर येथील शारीरिक शिक्षक, खेळाडू, समाजसेवक व स्वयंसेवक परिश्रम घेत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. सतीशचंद्र भट्ट यांनी दिली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!