Join WhatsApp group

मुंबई-हावडा दुरंतो एक्सप्रेसला अकोल्यात ऐतिहासिक थांबा – खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नांना यश

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला (प्रतिनिधी) – अकोला शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा मुंबई-हावडा दुरंतो एक्सप्रेस (१२२६१) गाडीचा १ सप्टेंबर रोजी पहाटे १२:४० वाजता अकोला रेल्वे स्थानकावर ऐतिहासिक थांबा झाला. गाडी प्लॅटफॉर्मवर दाखल होताच “भारत माता की जय”, “जय श्रीराम”, “अनुपभाऊ धोत्रे आगे बढ़ो” अशा गगनभेदी घोषणांनी वातावरण दणाणून गेले.

खासदार अनुपभाऊ धोत्रे यांनी रेल्वे चालक आलो कुमार व सहकारी संजय बॅनर्जी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. या वेळी आमदार वसंत खंडेलवाल, आमदार रणधीर सावरकर, रेल्वे सल्लागार समिती सदस्य वसंत बाचोका, ॲड. अमोल इंगळे, माधव मानकर, पवन महाले, गिरीश जोशी, विजय तोष्णीवाल, पंकज राठी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या गाडीला अकोल्यात थांबा मिळवून देण्यासाठी खासदार अनुपभाऊ धोत्रे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने रेल्वे मंत्रालयाने अधिकृत थांब्याला मंजुरी दिली आहे.

भारतीय जनता पार्टी अकोला महानगरतर्फे या ठिकाणी स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले. खासदार अनुपभाऊ धोत्रे, आमदार रणधीर सावरकर व आमदार वसंत खंडेलवाल यांच्या हस्ते गाडीला हिरवी झेंडी दाखवण्यात आली.

या वेळी भाजप महानगराध्यक्ष जयंत मसने, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, मा. विजय अग्रवाल, माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

👉 खासदार अनुप धोत्रे – दुरंतो एक्सप्रेसच्या थांब्यामुळे अकोल्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून शहराच्या विकासासाठी हे एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!