Join WhatsApp group

Ads

-

मुकेश अंबानींना लॉटरी, रिलायन्सच्या हाती जगातील सर्वात मोठ्या ‘तेलाच्या खाणी’ची चावी| महासत्तेची महादादागिरी!

By Sarkar Maza

February 13, 2026 5:24 pm

Ads

न्यूज डेस्क : दि.१३ :

देशातील सर्वात मोठी मौल्यवान कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या हाती मोठं यश आलं आहे. मुकेश अंबानींच्या मालकीच्या RIL ला अमेरिकेकडून व्हेनेझुएलाचे कच्चे तेल खरेदी करण्यासाठी परवाना मिळाला आहे. होय, रॉयटर्सने एक्सकॅलुसिव्ह अहवालात म्हटले आहे की यासह रिलायन्स आता कोणत्याही निर्बंधांशिवाय तेल खरेदी करू शकेल.

भारतासोबत ट्रेड डील आणि आता अमेरिकेकडून देशातील सर्वात मौल्यवान कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीजला आनंदाची बातमी मिळाली आहे. जागतिक बाजारात ‘ऑइल गेम’चा विषय तापला असताना मुकेश अंबानींच्या रिलायन्सने मोठं यश मिळवलं आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार अमेरिकेने रिलायन्सला व्हेनेझुएलाचे तेल खरेदी करण्यासाठी जनरल परतावा दिला आहे.

व्हेनेझुएलाच्या तेलावर आता अमेरिकेची मालकी
व्हेनेझुएलाच्या धर्तीमध्ये जगातील सर्वात मोठा तेलाचा साठा असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्रप्रमुख निकोलस मादुरो यांना अटक केली.त्यानंतर अमेरिकन अधिकाऱ्यांनीदोन्ही देशांमधील 2 अब्ज डॉलर्सचा तेल पुरवठा करार सुलभ करण्यासाठी व्हेनेझुएलाच्या ऊर्जा उद्योगावरील निर्बंध कमी करणार असल्याचे सांगितले. त्याचवेळी, व्हेनेझुएलाच्या तेल उद्योगाची पुनर्रचना करण्यासाठी अमेरिकेने 100 अब्ज डॉलर्सची योजना देखील विकसित केली आहे.

अशाप्रकारे, आता रिलायन्सला परवाना जारी केल्यामुळे व्हेनेझुएला च्या तेल निर्यातीला गती मिळू शकेल आणि व्हेनेझुएला तेल खरेदी करण्यासोबत रिलायन्स आता तेच तेल विकूही शकेल, ज्यामुळे रिलायन्सला कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्यास मदत होईल. जामनगर येथे रिलायन्सकडे जगातील सर्वात मोठे रिफायनिंग कॉम्प्लेक्स आहे, जिथे सर्व प्रकारच्या कच्च्या तेलावर प्रक्रिया करणे शक्य आहे. रिलायन्सच्या दोन रिफायनरीजमध्ये दररोज 1.4 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलावर प्रक्रिया होऊ शकते.

फायदा काय होणार?
रिलायन्सने जानेवारीमध्ये परवान्यासाठी अर्ज केला होता. रिलायन्सने या महिन्यात व्हेनेझुएलाकडूनविटोल आणि ट्रॅफिगुरा या व्यापारी कंपन्यांकडून करण्यात आली होती, ज्यांच्याकडे आधीच अमेरिकन परवाने आहेत, 20 लाख बॅरल कच्चे तेल खरेदी केले.

पण, आता रिलायन्सला व्हेनेझुएलाकडून थेट कच्चे तेल खरेदीचा परवाना मिळाल्यामुळे कंपनीची मोठी बचत होण्याचा अंदाज आहे. व्हेनेझुएलाचे तेल रशियन तेलापेक्षा स्वस्त असून डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच भारतावरील अतिरिक्त दंडात्मक 25% टॅरिफ रद्द केला, जो भारताला रशियन तेल खरेदी करण्यापासून रोखण्यासाठी लादण्यात आला होता.

रिलायन्ससह भारतीय रिफायनर्स एप्रिलमध्ये डिलिव्हरीसाठी रशियन तेल खरेदी टाळत आहेत आणि अशा व्यवहारांपासून जास्त काळ दूर राहण्याची अपेक्षा आहे, असे रिफायनिंग आणि व्यापार सूत्रांनी सांगितले, ज्यामुळे भारताला अमेरिकेसोबत व्यापार करार करण्यास मदत होऊ शकते.

Related Article

सोनम वांगचुकांच्या आंदोलनावर अकोला जिल्ह्यातील कोचिंग क्लासेस गप्प का?

अकोल्यात ‘नकली नोटांचा’ मोठा खेळ उघड! LCB च्या धाडीत ९७ हजारांच्या बनावट नोटा जप्त; मूर्तिजापूर कनेक्शन समोर

गुटखाबंदीचा फज्जा? बोरगाव मंजूत आजही सर्रास गुटखा विक्री; बनावट गुटखा रॅकेटचा संशय, प्रशासन झोपेत?

मूर्तिजापूर–बोरगाव–अकोला असा बनावट गुटखा रॅकेटचा प्रवास? कारवाईनंतर अनेक प्रश्न अनुत्तरित

कारंज्यात पेट्रोल-डिझेल चोरीचा गोरखधंदा? नॅशनल ढाब्यावर टँकरमधून इंधन उतरविण्याची चर्चा; स्फोटाच्या धोक्याने नागरिकांमध्ये चिंता

बेटा नंबरी… बाप दस नंबरी? अकोल्यातील बनावट गुटखा रॅकेटवर सलग दुसरी धडक कारवाई! अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे ऑपरेशन प्रहार

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!