Join WhatsApp group

Ads

श्री. ह. व्या. प्र. मंडळाच्या कुस्तीगीरांचा दणदणीत विजय

By Sarkarmzanews

January 29, 2025 8:31 pm

Ads

दिनांक २९ : अमरावती : दिनांक 26 व 27 जानेवारी मा. ना. नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार क्रिडा महोत्सव 2025 अंतर्गत विदर्भ स्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन झिंगाबाई टाकळी नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये विदर्भातील नामवंत महिला व पुरुष कुस्तीगीरांचा समावेश होता .

त्यामध्ये अमरावती शहर च्या संघाने पण सहभाग घेतला होता त्यात कुमार कुस्तीगीर परी जदुसंकत हिने 46 किलो वजन गटात अनेक प्रेक्षणीय कुस्त्या करून द्वितीय क्रमाक मिळवला 45 किलो अनिल दळवे द्वितीय ,50 कीलो मंगेश खोकले द्वितीय, व वरिष्ठ महिला गटात 50 किलो वजन गटात सोनाली गुप्ता हिने द्वितीय क्रमांक, 53 किलो बाली पवार प्रथम क्रमांक मिळवला.
76 किलो वजन गटात गौरी धोटे सुद्धा अतिशय प्रेक्षणीय कुस्त्या करत द्वितीय क्रमांक प्राप्त केला नुकत्याच देवडी वर्धा येथे झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 72 किलो वजन गटात गौरी धोटे हिला सिल्वर पदक मिळाले होते
वरिष्ठ पुरुष गटात 53 किलो वजन गटात पियुष डेंडवाल द्वितीय, 57 किलो अर्जुन यादव प्रथम,65 किलो वजन गटात अनुज सारवान प्रथम क्रमांक प्राप्त केले .

70 किलो वजन गटात अंकित यादव द्वितीय पदक प्राप्त केले. संघा सोबत संघ व्यवस्थापक म्हणुन करणं यादव होते हे सर्व कुस्तीगीर श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या कुस्ती विभागात डॉ संजय तिरथकर ,जितेंद्र भुयार यांचे मार्गदर्शनात सराव करतात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकररावजी वैद्य ,सचिव डॉ. माधुरी चेंडके, उपाध्यक्ष डॉ श्रीकांत चेंडके, डॉ. संजय तिरथकर ,अँड प्रशांत देशपांडे, प्रा. रवींद्र खांडेकर, इरफान खान, जितेंद्र डीके, आरिफ खान,समीर देशमुख आणि समस्त ज्येष्ठ पैलवान यांनी अभिनंदन केले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!