Join WhatsApp group

Ads

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या खेळाडूंच्या मातांचा ‘जिजामाता पुरस्कार’ देऊन गौरव

By Sarkar Maza

May 12, 2026 6:40 pm

Ads

nasik _ श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, दिल्ली, रामभूमी बहुउद्देशीय मंडळ, स्व. उत्तमराव ढिकले फाउंडेशन व दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकप्राप्त खेळाडूंच्या मातांचा तसेच प्रथम वर्ग अधिकारी आणि न्यायाधीश पदावर नियुक्त झालेल्यांच्या मातांचा ‘जिजामाता पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

हा गौरव सोहळा बुधवार, दि. १४ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता जिजामाता क्रीडांगण, तलाठी कॉलनी येथे आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून भिवंडी महानगरपालिकेचे देविदास पवार अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

यावेळी अण्णासाहेब पाटील, सरिता सोनवणे, हेमंत शेट्टी, मोनिका हिरे, सागर लामखेडे, चंद्रकांत बनकर, मिलिंद पाटील, गंगाधर पोखरकर तसेच अशोक दुधारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दीपक निकम, आनंद खरे, अशोक कदम, राजू शिंदे, कुणाल अहिरे, अविनाश वाघ, अनिल गायकवाड, अर्जुन वेलजाळी, योगेश नाटकर, मनीषा काठे, ज्योती निकम, आनंद चकोर, शैलेश रकिबे व सतीश बोरा आदी परिश्रम घेत आहेत.

समाजात कर्तृत्ववान मुलांच्या यशामागील मातृत्वाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आयोजित हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!