Join WhatsApp group

Ads

मूर्तिजापुरात मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडले; दोन आयफोनसह ७५ हजारांची रोकड लंपास

By Sarkarmzanews

September 30, 2026 8:48 am

Ads

मूर्तिजापूर : शहरातील पटेल प्लाझा कॉम्प्लेक्समधील तांदळे इलेक्ट्रॉनिक्स या मोबाईल रिपेअरिंग दुकानाचे शटरचे कुलूप तोडून अज्ञात दोन चोरट्यांनी दोन आयफोन आणि रोख रक्कम असा सुमारे १ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.याप्रकरणी दुकानमालक शिवा संजय तांदळे (२४), रा. धोत्रा शिंदे, ता. मूर्तिजापूर यांनी मूर्तिजापूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

त्यावरून पोलिसांनी अज्ञात दोन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५, ३३१(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. FIR क्रमांक ६९४/२०२६ आहे.तक्रारीनुसार, शिवा तांदळे यांचे पटेल प्लाझा कॉम्प्लेक्समधील दुकान क्रमांक ४१ येथे मागील दोन वर्षांपासून मोबाईल व लॅपटॉप रिपेअरिंगचा व्यवसाय आहे. २८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता दुकान बंद करून ते घरी गेले होते. त्यावेळी मोबाईल साहित्य खरेदीसाठी घेतलेली ७० हजार रुपयांची रोकड त्यांनी दुकानातील गल्ल्यात ठेवली होती.

दरम्यान, २९ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे १.५० ते २ वाजण्याच्या दरम्यान दोन अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून शटर वाकवले आणि दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी रिपेअरिंगसाठी आलेला आयफोन १३, तसेच दुकानमालकाचा आयफोन १३ प्रो, अशी दोन मोबाईल उपकरणे आणि गल्ल्यातील रोकड असा एकूण सुमारे १ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे.सकाळी सुमारे ६.४१ वाजता शेजारील दूध डेअरीवरील कामगार चेतन पवार यांनी दुकानाचे शटर उघडे असल्याचे फोनवरून कळविल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.

घटनास्थळी पाहणी केल्यानंतर शेजारील दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अज्ञात व्यक्ती दुकानाचे कुलूप तोडून शटर वाकवताना दिसून आल्याचे तक्रारीत नमूद आहे.मूर्तिजापूर शहर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात येत आहे.

Related Article

मूर्तिजापुरात मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडले; दोन आयफोनसह ७५ हजारांची रोकड लंपास

२८ सप्टेंबर हा दिवस “माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने या लक्षवेधी कायद्याविषयी थोडक्यात माहिती…

शिवण खुर्दमध्ये शहीद भगतसिंग जयंती उत्साहातशहीद भगतसिंग क्रीडांगणाचे उद्घाटन; तरुणाईला मिळाले हक्काचे क्रीडा व्यासपीठ

🌡️ सुपर एल निनोचा इशारा! जगभरात 4.51 लाख अतिरिक्त मृत्यूंची शक्यता; भारतालाही मोठा धोका

नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; सार्वजनिक नवदुर्गा महोत्सव मंडळातर्फे स्तंभपूजन

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी गजानन महाराज संस्थानचा मदतीचा हात; मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १.११ कोटींचा सहयोग

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!