Join WhatsApp group

Ads

पनवेल मध्ये मनसे चे आंदोलन,रिक्षांवर झळकले मराठी चे बॅनर…

By Sarkar Maza

April 24, 2026 9:41 pm

Ads

पनवेल प्रतिनिधी:-(श्रीनाथ गणेश लाड)

पनवेल महानगरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) रिक्षांवर ‘मराठी’ भाषेचे स्टिकर लावण्याची विशेष मोहीम राबवली आहे.पनवेल रेल्वे स्थानक परिसर आणि शहराच्या विविध भागांत मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षांना हे स्टिकर्स लावले आहेत. 

परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी १ मे २०२६ पासून रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे या मोहिमेद्वारे मराठी रिक्षाचालकांच्या पाठीशी उभी राहिली आहे.  रिक्षांवर *”मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, माझ्या रिक्षात बसा”* अशा आशयाचे स्टिकर्स लावण्यात येत आहेत.

मराठी रिक्षाचालकांनी या मोहिमेचे स्वागत केले असून त्यांच्यात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून परप्रांतीय चालकांच्या वाढत्या प्रभावाविरोधात ही मोहीम मराठी चालकांना पाठबळ देणारी ठरत आहे.

महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक रिक्षाचालकाला मराठी भाषा आलीच पाहिजे, अशी ठाम भूमिका मनसेने घेतली आहे. मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या आणि संप पुकारणाऱ्या संघटनांना मनसेने कडक इशारा दिला आहे. 

या आंदोलनात मनसेचे महानगर सचिव पराग बालड, वाहतूक सेना जिल्हा संघटक सचिन जाधव, जिल्हा सचिव अतुल चव्हाण, तसेच वाहतूक सेनेच्या उपाध्यक्ष पूनम जैस्वाल आणि विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अमर पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

या आंदोलनामुळे पनवेलमधील मराठी रिक्षाचालकांना एक वेगळी ओळख आणि सन्मान मिळत असून प्रवाशांनीही मराठी भाषिक चालकांच्या रिक्षांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन मनसेतर्फे करण्यात आले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!