Join WhatsApp group

सोयाबीन खरेदीतील फसवणुकीवर आमदार रणधीर सावरकरांचा सभागृहात ठाम आवाज

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : २ जुलै २५ : सन २०२४-२५ च्या हंगामात सोयाबीन खरेदीवेळी अंदुरा अग्रो प्रोड्युसर शेतकरी उत्पादक कंपनीने शासनाच्या योजनेंतर्गत शेतकऱ्यांची तब्बल ₹६३,४४,९२४/- इतक्या रकमेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या गंभीर विषयावर आमदार रणधीर सावरकर यांनी तारांकित प्रश्न क्र. १०६४४ च्या माध्यमातून विधानसभेत आवाज उठवत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची जोरदार मागणी केली.उरळ (ता. बाळापूर, जि. अकोला) येथे संबंधित कंपनीने १९,७२३.९२ क्विंटल सोयाबीन खरेदी करून केवळ १८,४४७.५५ क्विंटलच्या वखार पावत्या नाफेड कार्यालयात जमा केल्या. उर्वरित १२९७ क्विंटल माल गोदामात जमा न करता, बनावट पावत्यांच्या आधारे शासकीय निधीच्या विनियोगाचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी अंदुरा अग्रो प्रोड्युसर कंपनीच्या संचालकांसह ११ जणांविरुद्ध उरळ पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कंपनीला काळ्या यादीत टाकून भविष्यातील कोणत्याही शासकीय खरेदी प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे.पणन मंत्री मा. जयकुमार रावल यांनी उत्तरात सांगितले की, संस्थेच्या अनामत रकमेवर जप्ती आणण्यात आली असून, शेतकऱ्यांना देयकं अदा करण्यासाठी उर्वरित रक्कम वसुलीची प्रक्रिया सुरू आहे.

आमदार रणधीर सावरकरांनी या उत्तरावर समाधान व्यक्त न करता, दोषींवर कठोर कारवाईसाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी केली. शेतकऱ्यांना त्वरित न्याय मिळावा, दलालांवर लगाम घालावा, शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा, अशी त्यांची ठाम भूमिका होती.गेल्या अकरा वर्षांपासून शेतकरीहितासाठी संघर्ष करणारे सावरकर, हे प्रकरण थांबवणार नसून जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी सभागृहात व्यक्त केला.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!