Join WhatsApp group

Ads

-

“शब्दाला जागले आमदार हरीश पिंपळे; कार्यकर्त्याला नगराध्यक्षपद, पदग्रहणासाठी वाहन भेट”

By Sarkarmzanews

January 1, 2026 11:14 am

Ads

मुर्तिजापूर: दिनांक ०१: मुर्तिजापूर शहराच्या राजकारणात आज एक सकारात्मक आणि आदर्शवत चित्र पाहायला मिळाले. एका सामान्य कार्यकर्त्याला नगराध्यक्षपदापर्यंत नेणारे आमदार हरीश पिंपळे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाचे मोठेपण सिद्ध केले.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष हर्षल साबळे यांच्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने आमदार पिंपळे यांनी जनतेच्या सेवेसाठी आणि पदग्रहण सोहळ्याला जाण्यासाठी नवीन चारचाकी वाहन सप्रेम भेट देत कार्यकर्त्यांप्रती असलेली आपुलकी दाखवून दिली.

विधानसभा निवडणुकीच्या काळात “माझे सर्वस्व आता कार्यकर्त्यांसाठी” असा शब्द दिलेल्या आमदार हरीश पिंपळे यांनी तो केवळ भाषणापुरता न ठेवता कृतीतून साकार केला आहे.

पक्षनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सातत्याने जनतेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्यांनी नगराध्यक्षपदाची संधी देत कार्यकर्ता हाच पक्षाचा खरा आधार असल्याचा संदेश दिला आहे.

नगराध्यक्ष हर्षल साबळे यांचा प्रवास हा सामान्य कार्यकर्त्यापासून शहराच्या प्रथम नागरिकापर्यंतचा असून, तो आमदार पिंपळे यांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाला, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

पदग्रहण सोहळ्यावेळी दिलेली वाहन भेट ही केवळ औपचारिक बाब नसून, जनतेची कामे अधिक गतीने व्हावीत यासाठी केलेली दूरदृष्टीपूर्ण मदत असल्याचे बोलले जात आहे.

या घटनेमुळे राजकारणात शब्दाला किंमत असते आणि नेतृत्व म्हणजे केवळ सत्ता नव्हे तर कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणे असते, हे आमदार हरीश पिंपळे यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!