Join WhatsApp group

Ads

--

आमदार हरीश पिंपळे यांनी केले पिक विमा कर्मचार्याणा विश्राम गृहात कुलूप बंद

By Sarkarmzanews

January 6, 2025 9:00 pm

Ads

मुर्तीजापुर : दिनांक ०६ : आमदार हरीश पिंपळे यांनी भारतीय किसान संघाच्या मागणीवरून पिक विमा संदर्भात शेतकऱ्यांच्या प्राप्त तक्रारीची दखल घेत व निराकरण करण्यासाठी व शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई पिक विमा कंपनीकडून मिळून देण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर मूर्तिजापूर येथे सोमवार दि.०६/०१/२०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता बैठक आयोजित केली होती त्याकरिता जिल्हा कृषी अधीक्षक अकोला, तहसीलदार मॅडम मुर्तीजापुर , तालुका कृषी अधिकारी मुर्तीजापुर , पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी व मुर्तिजापुर तालुक्यातिल जवळ पास ५०० शेतकरी बांधव उपस्थित होते.

या बैठकीत आता पर्यंत शेतकऱ्यांला पिक विमा का भेटला नाही असे सवाल आमदार हरीश पिंपळे यांनी करत विमा कंपनीच्या अधिकारी वर्गाला आणि कृषि विभागला धारेवर धरले. तसेच पिक विमा कंपनीचा कर्मचार्यांनी उडवा उडवीचे उत्तर आमदारांना दिले व लवकरात लवकर आम्ही पिक विमा देऊ असे सांगत काढता पाय काढण्याचा प्रयन्त केला पण आमदार हरीश पिंपळे यांनी जेव्हा पर्यंत पिक विमाचे पैसे शेतकऱ्यांचा खात्यात जमा होत नाही तेव्हा पर्यंत यांना कुलूप बंद ठेवा असे आदेश देत पिक विमा कर्मचार्याणा विश्राम गृहात कुलूप बंद केले.

तसेच त्यांचा चहा नाष्टा व जेवणाची व्यवस्था आत मध्येच केली जेव्हा पर्यंत काम पूर्ण होत नाही तेव्हा पर्यंत यांना सोडू नका असा आदेश भारतीय किसान संघाच्या शेतकर्यांना दिला पण सायंकाळी जिल्हाधिकारी यांचा सोबत चर्चा करून यांना संध्याकाळी सोडण्यात आले व शुक्रवार पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांचे विमाचे पैसे जमा होतील असे विमा कंपनी कडून सांगण्यात आले.

जर शुक्रवार पर्यंत शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे नाही जमा झाले तर भारतीय किसान संघाच्या वतिने उग्र आंदोलन करण्यात येणार असा इशारा राहुल पुरुषोत्तम राठी भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत उपाध्यक्ष व आनंद देवीदास बांगड़ जनमंच शेतकरी प्रतिनिधी यांनी दिला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!