Join WhatsApp group

मुर्तीजापूर शहरात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक: १७ ऑगस्ट २५ : मुर्तिजापूर

मुर्तीजापूर तालुक्यातील प्रतिक नगर येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी मुलीचे वडील यांनी मुर्तीजापूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ६ वाजल्यानंतर अल्पवयीन मुलीचा मोबाईल लागेनासा झाला.

चौकशी केली असता कळले की विकी उर्फ सोनु विजय डोगरे (वय २२, रा. पळसोबडे, ता. जि. अकोला) याने लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेले आहे असे प्रार्थमिक माहिती मध्ये पोलिसांना समजले.

या प्रकरणी मुर्तीजापूर शहर पोलीस ठाण्यात अप. नं. ३९५/२०२५, कलम १३७(२) भा.न्या.संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास प्रो. उपनिरीक्षक नितीन राठोड करीत आहेत.

प्रकरणी मपोहेका शालिनी सोळंके यांनी दाखल कार्यवाही केली आहे.

तसेच ही घटना १२/०८/२०२५ रोजी सायं. ६ नंतर घडली असून पोलिसांनी: १५/०८/२०२५ रात्री ९:२१ वाजता गुन्हा नोंदविला गेला.

👉 या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!