Join WhatsApp group

MIDC व्यापारी सुफीयान हत्या प्रकरण – १२ तासांत आरोपी ताब्यात

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : शहरातील शिवणी येथील व्यापारी सुफीयान खान शमशोद्दीन खान (वय ३२) याचा खून झाल्याने खळबळ उडाली होती. ही घटना दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सायं. साडेसात वाजता रेल्वे लाईनलगत मलकापूर बोगद्याजवळ घडली.

फिर्यादी शेहरे आलम समीरउल्ला (रा. शिवणी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते, त्यांचा मालक सुफीयान खान आणि साजीद खान हे तिघे कारने त्या ठिकाणी गेले असता मोटारसायकलवरून आलेल्या चौघा अनोळखी इसमांनी “इकडे मुलगी वगैरे घेऊन आला आहे का?” असा सवाल करून वाद घातला. त्यानंतर आरोपींनी सुफीयान खानवर लायबुक्या व चाकूंनी हल्ला केला. यात तो गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मरण पावला, तर साजीद खान हा गंभीर जखमी आहे.

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. कोणतेही CCTV फुटेज नसतानाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या १२ तासांत सहा आरोपींना व एक विधी संघर्षगस्त बालकाला मोटारसायकलसह ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेले आरोपी :

1. फैजान खान मुर्शरफ खान (रा. हाजी नगर, शिवणी, अकोला)

2. अब्दुल अरबाज अब्दुल इस्माईल (रा. ताज चौक, अकोट फाईल, अकोला)

3. शोएब अली उर्फ राजा तैयब अली (रा. सैयदपुरा, शिवणी, अकोला)

4. शेख अस्लम शेख अकबर (रा. सोळशे प्लॉट, अकोट फाईल)

5. सैय्यद शहबाज उर्फ सोनु सैय्यद मुजीब (रा. रामदास मठ, अकोट फाईल)

6. विधी संघर्षगस्त बालक

सदर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना पुढील तपासासाठी खदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, अकोला तसेच खदान व MIDC पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने केली.

👉 घटनेचे कारण आरोपींना फिर्यादी व त्याचे साथीदार सोबत मुलगी आहे असा गैरसमज झाल्याने वादातून खून झाला असल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!