Join WhatsApp group

Ads

--

मटका मतपेटी की राजकीय ऑपरेशन प्रहार? निवडणुकीनंतर उघडलेले सत्य

By Sarkarmzanews

January 1, 2026 11:29 pm

Ads

मुर्तिजापूर: दिनांक ०२ : शहरात अनेक वर्षांपासून बिनधास्त सुरू असलेले वरली मटक्याचे अवैध धंदे अचानक बंद पडणे हा केवळ कायदेशीर निर्णय नसून राजकीय सत्तासमीकरण बदलल्याचा थेट परिणाम असल्याची चर्चा उघडपणे सुरू झाली आहे.


निवडणुकीच्या काळात हे मटका अड्डे सुरू असताना
तेव्हा कायदा झोपलेला होता का?


की मतपेटीसाठी कायद्यालाच सुट्टी देण्यात आली होती?


राजकीय आश्रय असल्याशिवाय हे धंदे इतकी वर्ष सुरू राहू शकतात का?


निवडणुका संपताच मटका अचानक बंद होतो, याचा अर्थ काय घ्यायचा?


निवडणूक काळात दिलेले अभयदान आता संपले का?


ज्यांचा वरदहस्त होता त्यांनी हात मागे घेतले म्हणूनच धंदे थांबले का?

की सत्ता बदलताच ‘हप्ते’ आणि ‘संरक्षण’ यांची साखळी तुटली?


राजकीय नेत्यांना एक प्रश्न विचारला जातो—


मटका चालू असताना तुमची नैतिकता कुठे होती?


गरीब, मजूर, शेतकरी मटक्यात बरबाद होत असताना तुम्ही कोणाच्या बाजूने उभे होता?


निवडणूक जिंकण्यासाठी समाजाचे नुकसान चालत होते का?


आज प्रशासन हालचाल करत असल्याचे चित्र दाखवले जात आहे, पण
हे आदेश खालून आले की वरून?


राजकीय संकेत मिळाल्याशिवाय एकही फाईल हलत नाही, हे सत्य नाही का?


पोलीस स्वतंत्र असते तर ही कारवाई इतक्या उशिरा का?


यापूर्वीही अशा कारवाया झाल्या, पण
त्या कायमस्वरूपी का ठरल्या नाहीत?


प्रत्येकवेळी राजकीय हस्तक्षेपानेच मटका पुन्हा उभा राहिला नाही का?


यावेळी तरी राजकारणी हात झटकणार आहेत का?


आज वरली मटका बंद असल्याचे सांगितले जात असले तरी
तो खरोखर बंद झाला आहे का, की फक्त भूमिगत गेला आहे?


उद्या व्हॉट्सॲप, ऑनलाईन लिंक, नव्या कोडवर्डने तो परत येणार नाही याची हमी कोण देणार?

कि हा राजकीय ऑपरेशन प्रहार?


मुर्तिजापूरकरांना आता उत्तर हवे आहे—
मटका बंद झाला, पण राजकीय संरक्षण बंद झाले का? की पुन्हा संधी मिळताच हेच धंदे सुरू होणार?


जोपर्यंत


राजकीय इच्छाशक्ती प्रामाणिकपणे पुढे येत नाही,
तोपर्यंत वरली मटका बंद होणे हे
कायद्याचे यश नव्हे, तर राजकारणाचा तात्पुरता डाव ठरणार, अशीच भावना जनतेत आहे.

आता हा राजकीय ऑपरेशन प्रहार अजून किती एक नंबर व दोन नंबर धंद्यावाल्यांचे धंदे बंद पाडणार हे पाहणे रोचक ठरणार आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!