Join WhatsApp group

Ads

स्कूल ऑफ स्काॅलर्स चा मास्टर समर्थ अविनाश मसराम ठरला पुन्हा अव्वल…

By Sarkarmzanews

December 30, 2024 8:48 am

Ads

यवतमाळ : दिनांक 30: मास्टर समर्थ अविनाश मसराम याने बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ११ वर्षाखालील गटामध्ये पुन्हा एकदा यशाचा झेंडा रोवला.

२५ डिसेंबर २०२४ ला स्वर्गीय सविता बक्षी चॅरीटेबल ट्रस्ट, द्वारा रीफॉर्मस क्लब अमरावती येथे आयोजित ४ थी एकदिवसीय खुली जलदगती बुद्धिबळ स्पर्धा आयोजीत केली होती

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून २०६ बुद्धिबळ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. ज्यामध्ये एकूण आठ फेऱ्या होत्या, यात विविध नामवंत खेळाडूंशी चुरशीने लढत देत समर्थ ने आपला खेळ उंचावला. ज्यामध्ये सहा दिग्गज खेळाडूंना नमवित समर्थने सहा गुण मिळवीत प्रथम क्रमांकावर आपले नांव कोरले.

बक्षीस वितरणाच्या वेळेस व्यासपीठावर रीफॉर्मस क्लब चे सचिव राजेश राघानी,सदस्य दीपक अडतीया, स्व. सविता बक्षी चॅरीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष गिरीश बक्षी, अमरावती बुद्धिबळ संघटनेचे सचिव पंवन दोडेजा, कार्यक्रमाचे संयोजक मंदार बक्षी, मुख्य परीक्षक आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे सर उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. या संपूर्ण बुद्धिबळ स्पर्धेत २०६ खेळाडूंमध्ये ११ वर्ष वयोगटात त्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

या महिन्यातच त्याला जागतिक फिडे च्या ऑनलाईन अँरेना मध्ये *अँरेना कॅंडीडेट मास्टर* चा खिताब मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारा समर्थ एकमेव बुद्धिबळ खेळाडू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बुद्धिबळ क्षेत्रातल्या विविध मान्यवरांकडून त्याच्या खेळाचे कौतुक करून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

तो यवतमाळ येथील श्रीराम बुद्धिबळ क्लब चा खेळाडू असून आपल्या यशाचे श्रेय आई विना अविनाश मसराम, वडील प्रा. अविनाश रामपाल मसराम तथा प्रशिक्षक अभिजीत पवार, प्राचार्य रीना काळे, सुपरवायझर सायली कशाळकर, प्रशासकीय अधिकारी श्रीकांत ठाकरे,शारीरिक शिक्षक प्रमुख संजय काेल्हे, पंकज शेलाेटकर, महेश गहूकार, राेशना घूरडे,हर्षा ईगळे आणि त्याचा मोठा भाऊ चि. राम अविनाश मसराम यांना देतो.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!