Join WhatsApp group

सुसाट वेगाने वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाई करा . मनसे तालुकाध्यक्ष गौरव मोरे यांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन.

Photo of author

By Sarkarmzanews

Share

न्यूज डेस्क – शहरात दिवसे-दिवस सुसाट वेगाने विना परवाना गाडी चालवणाऱ्या अल्प वयीन मुलांचा उपद्रव वाढला आहे.

या अल्पवयीन मुलांकडून ट्रिपलसिट गाडी चालवणे.दुचाकी गाडीवर स्टंट करणे,बुलेट गाडीद्वारे स्पीड वाढउन फटाके फोडणे,वेगवेगड्या प्रकारचे हॉर्न लावून करकाश आवाज करणेअशप्रकारचे उपद्रव अल्पवयीन मुलांकडून होत असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच अनेकदा लहान मोठे अपघातही होत आहेत. तरी एखादा मोठा अपघात होऊन जीवित हानी होण्यापूर्वी अल्पवयीन मुलांवर कारवाई करावी..

अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुकाध्यक्ष गौरव मोरे यांनी दिला आहे.

निवेदन देताना उपतालुकाध्यक्ष रोहन नवघरे,संघटक चेतन सोळंके,सर्कल अध्यक्ष आशिष कावरे,वैभव महल्ले ,शहर उपाध्यक्ष अनिकेत शिरभाते प्रजेश बुते अदित्य खोकले सचिन काटोले ,तथा अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!