Join WhatsApp group

Ads

“जंगलमध्ये मंगल… पण नेमकं कोणाचं? रॉयल्टीशिवाय वाळूचा खेळ सुरू!”

By Sarkar Maza

March 22, 2026 5:15 pm

Ads

मुर्तिजापूर : दिनांक २२ : तालुक्यातील एका वाळू घाटांवर गेल्या काही दिवसांपासून काहीतरी “अदृश्य” सुरू असल्याची चर्चा हळूहळू जोर धरू लागली आहे. अधिकृत रॉयल्टी नसतानाही वाळूचा उपसा होत असल्याचे संकेत मिळत आहेत… पण आश्चर्य म्हणजे, या सगळ्यामागे नेमकं कोण आहे, हे कुणीही उघडपणे सांगायला तयार नाही.

स्थानिकांच्या मते, रात्री उशिरा काही ट्रॅक्टर आणि मोठी वाहने घाटाकडे जाताना दिसतात… पहाटेपर्यंत ती परतही येतात. मात्र, दिवसा घाटावर शांतता असते—जणू काहीच घडलं नाही!“आवाज येतो, हालचाल दिसते… पण कुणालाच काही दिसत नाही,” अशी कुजबुज गावात ऐकायला मिळत आहे.

अधिकृत कागदपत्रे, रॉयल्टी किंवा परवानगी याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर येत नाही. तरीही उपसा सुरू असल्याच्या चर्चा वाढत आहेत. काहीजण तर सूचकपणे सांगतात की, “सगळं काही माहिती आहे… पण वरपर्यंत पोहोचलेलं आहे,” त्यामुळे कोणीही उघड बोलत नाही.

प्रश्न मात्र तसाच कायम आहे—ही वाळू कोण काढतंय? कोणाच्या इशाऱ्यावर हा खेळ चाललाय? आणि सगळं माहिती असूनही शांतता का?

सध्या तरी हे सगळं “जंगलमध्ये मंगल”सारखंच दिसत आहे—जिथे नियम आहेत, पण लागू नाहीत… आणि सगळ्यांना माहिती आहे, पण कोणीच बोलत नाही.

आता प्रशासन या गूढावर पडदा उचलणार का, की हे रहस्य असंच अंधारात दडून राहणार?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!