Join WhatsApp group

आपली दिवाळी बनवा आरोग्यदायी — डॉ. प्रशांत अवघाते यांचा नागरिकांना संदेश

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर – दिवाळी सण म्हणजे आनंद, गोडधोड आणि उत्साहाचा काळ. मात्र या उत्साहात आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, असा संदेश शहरातील नामांकित वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत अवघाते यांनी नागरिकांना दिला आहे.

डॉ. अवघाते यांनी सांगितले की, “दिवाळीचा काळ आनंदाचा असला तरी या काळात आरोग्यदायी सवयींचे पालन करणे आवश्यक आहे. रोज नियमित व्यायाम करा, सकस आणि संतुलित आहार घ्या, तसेच आपल्या शरीराबद्दल सजग रहा.”

ते पुढे म्हणाले की, “लहान मुलांना मोबाईल फोनपासून दूर ठेवा आणि त्यांना दररोज कोणत्याही क्रीडा प्रकारात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा. तसेच, आजारपणाची कोणतीही लक्षणे दिसल्यास स्वतः उपचार न करता योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या.”

शेवटी त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, “आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारल्यास दिवाळी केवळ प्रकाशाची नव्हे तर आरोग्याचीही ठरेल.”


Share

Leave a Comment

error: Content is protected !!