Join WhatsApp group

Ads

अकोला पोलीस दलात मोठी हालचाल; स्थानिक गुन्हे शाखेला नवे नेतृत्व मिळणार?

By Sarkar Maza

June 10, 2026 6:22 pm

Ads

अकोला : अकोला पोलीस दलातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदाच्या नियुक्तीबाबत उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. विद्यमान प्रभारी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या संभाव्य पदोन्नतीनंतर रिक्त होणाऱ्या या महत्त्वाच्या पदासाठी अनेक नावांची चर्चा रंगली होती.

मात्र अंतिम निर्णय अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेला नसल्याने पोलीस वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, खदानचे निरीक्षक मनोज केदारे, आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल जुमले, अकोट ग्रामीणचे ठाणेदार जुनघरे यांच्यासह काही बाहेरील जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती.

तसेच अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण वानखडे आणि वर्ध्यात कार्यरत निरीक्षक विलास पाटील यांच्याही नावांची चर्चा विभागीय स्तरावर सुरू आहे.

दरम्यान, विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार जुने शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन लेव्हरकर यांचे नाव सध्या सर्वाधिक आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे.

नियुक्तीबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचल्याचेही समजते. मात्र अधिकृत आदेश अद्याप जारी न झाल्याने कोणतीही शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही, असेही जाणकारांचे मत आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पद हे केवळ एका अधिकाऱ्याची बदली नसून जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

त्यामुळे या नियुक्तीकडे पोलीस विभागासोबतच राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचेही लक्ष लागले आहे.आता सर्वांच्या नजरा आजच्या घडामोडींवर खिळल्या आहेत.

आज सायंकाळपर्यंत या चर्चांना पूर्णविराम मिळणार का? की ऐनवेळी एखादे नवे नाव स्पर्धेत पुढे येऊन सर्व समीकरणे बदलणार? याचे उत्तर पुढील काही तासांत मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंत स्थानिक गुन्हे शाखेच्या खुर्चीभोवतीचा सस्पेन्स कायम राहणार आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!