Join WhatsApp group

Ads

कबड्डीची ऐतिहासिक परंपरा जपण्यासाठी माई सोशल बहुउद्देशीय क्रीडा मंडळाचा व कै. मारुती आप्पा पिंपळे संस्था यांचा पुढाकार

By Sarkarmzanews

October 1, 2026 6:45 pm

Ads

मुर्तीजापूर | प्रतिनिधी

कबड्डीच्या खेळाला मुर्तीजापूर शहराच्या क्रीडा इतिहासात विशेष स्थान आहे. या मातीतून अनेक खेळाडूंनी कबड्डीच्या मैदानावर आपली ओळख निर्माण केली आहे. शहराची ही कबड्डीची परंपरा जिवंत ठेवत नव्या पिढीतील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने माई सोशल बहुउद्देशीय क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

अॅम्युचर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भच्या मान्यतेने कै. मारुतीआप्पा विठ्ठलआप्पा पिंपळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेली ५३वी ज्युनिअर राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुले व मुली कबड्डी स्पर्धा २०२६-२७ आजपासून मुर्तीजापूरच्या क्रीडाप्रेमींना कबड्डीचा थरार अनुभवायला देणार आहे.

गाडगे महाराज विद्यालयाच्या मैदानावर रंगणार सामने

ही स्पर्धा २ ते ४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान श्री गाडगे महाराज विद्यालय, मेन रोड, मुर्तीजापूर येथे होणार आहे. स्पर्धेचे भव्य उद्घाटन आज सायंकाळी ६ वाजता होणार असून, विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या युवा खेळाडूंच्या दमदार सामन्यांनी मुर्तीजापूरचे क्रीडांगण दणाणून जाणार आहे.

स्मृती जपताना क्रीडा संस्कृतीला बळ

कै. मारुतीआप्पा विठ्ठलआप्पा पिंपळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा केवळ कबड्डीचे सामने नसून, क्रीडा संस्कृती आणि खेळाडूंच्या पुढील वाटचालीला बळ देण्याचा उपक्रम ठरत आहे. माई सोशल बहुउद्देशीय क्रीडा मंडळाने मुर्तीजापूरच्या कबड्डीच्या परंपरेला नवी ऊर्जा देत युवा खेळाडूंना राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्राच्या ज्युनिअर राज्य कबड्डी संघात निवडीची संधी मिळणार आहे. त्यामुळे युवा खेळाडूंसाठी ही स्पर्धा भविष्यातील मोठ्या संधींची दारे उघडणारी ठरणार आहे.

मुर्तीजापूरच्या मातीत रुजलेली कबड्डीची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा स्पर्धांची गरज आहे. मैदानावर खेळाडूंची चढाई-पकड रंगणार आणि मैदानाबाहेर मुर्तीजापूरकरांचा उत्साह दिसणार, अशी क्रीडामय वातावरणाची अपेक्षा आहे.

कबड्डीप्रेमी नागरिकांनी आज सायंकाळी ६ वाजता श्री गाडगे महाराज विद्यालय, मेन रोड, मुर्तीजापूर येथे उपस्थित राहून युवा खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Article

कबड्डीची ऐतिहासिक परंपरा जपण्यासाठी माई सोशल बहुउद्देशीय क्रीडा मंडळाचा व कै. मारुती आप्पा पिंपळे संस्था यांचा पुढाकार

“तुम्ही पूर्ण गावाला लुटलं आहे”; MSEDCL अधिकाऱ्याच्या वक्तव्यावर Solar Vendorची तक्रार

मूर्तिजापुरात मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडले; दोन आयफोनसह ७५ हजारांची रोकड लंपास

२८ सप्टेंबर हा दिवस “माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने या लक्षवेधी कायद्याविषयी थोडक्यात माहिती…

शिवण खुर्दमध्ये शहीद भगतसिंग जयंती उत्साहातशहीद भगतसिंग क्रीडांगणाचे उद्घाटन; तरुणाईला मिळाले हक्काचे क्रीडा व्यासपीठ

🌡️ सुपर एल निनोचा इशारा! जगभरात 4.51 लाख अतिरिक्त मृत्यूंची शक्यता; भारतालाही मोठा धोका

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!