Join WhatsApp group

Ads

---

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

By Sarkarmzanews

January 28, 2026 10:32 am

Ads

न्यूज डेस्क: दिनांक २८ :

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार यांच्या विमानाला आज २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी बारामतीमध्ये भीषण अपघात झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.

या अपघाताबाबत आतापर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ८:४५ ते ९:०० च्या दरम्यान बारामती विमानतळावर (गोजुबावी परिसर) ही घटना घडली.

विमान हे एक खाजगी चार्टर्ड विमान (Learjet 45) होते. अजित पवार मुंबईतील कॅबिनेट बैठक संपवून जिल्हा परिषद निवडणुकीच्या नियोजित दौऱ्यासाठी बारामतीला जात होते.

लँडिंगच्या वेळी विमानाचे संतुलन बिघडल्याने किंवा तांत्रिक बिघाडामुळे ‘क्रॅश लँडिंग’ झाले. विमान धावपट्टीवर कोसळल्यानंतर त्याला भीषण आग लागली.

विविध प्रमुख वृत्तवाहिन्या आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आहे.

त्यांच्यासोबत विमानात असलेल्या इतर ४ ते ५ जणांचाही (चालक दल आणि कर्मचारी) या अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

बचावकार्य व स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र आगीची भीषणता इतकी मोठी होती की विमानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि इतर ज्येष्ठ नेते तातडीने बारामतीकडे रवाना झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

Related Article

सोनम वांगचुकांच्या आंदोलनावर अकोला जिल्ह्यातील कोचिंग क्लासेस गप्प का?

अकोल्यात ‘नकली नोटांचा’ मोठा खेळ उघड! LCB च्या धाडीत ९७ हजारांच्या बनावट नोटा जप्त; मूर्तिजापूर कनेक्शन समोर

गुटखाबंदीचा फज्जा? बोरगाव मंजूत आजही सर्रास गुटखा विक्री; बनावट गुटखा रॅकेटचा संशय, प्रशासन झोपेत?

मूर्तिजापूर–बोरगाव–अकोला असा बनावट गुटखा रॅकेटचा प्रवास? कारवाईनंतर अनेक प्रश्न अनुत्तरित

कारंज्यात पेट्रोल-डिझेल चोरीचा गोरखधंदा? नॅशनल ढाब्यावर टँकरमधून इंधन उतरविण्याची चर्चा; स्फोटाच्या धोक्याने नागरिकांमध्ये चिंता

बेटा नंबरी… बाप दस नंबरी? अकोल्यातील बनावट गुटखा रॅकेटवर सलग दुसरी धडक कारवाई! अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे ऑपरेशन प्रहार

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!